
🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l वेंगुर्ला l प्रतिनिधी-
वरचीवाडी वेतोरे-मिरमेवाडी येथील रहिवासी तथा श्री देवी सातेरी हायस्कूलचे माजी संचालक तसेच कुडाळ शहरातील फुल व्यावसायीक शेखर गुणाजी गावडे (५६) यांचे अल्पशा आजाराने १ जानेवारी २०२५ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, भाऊ, बहिणी, पुतण्या, पुतणी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. सिधुदुर्ग जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे यांचे बंधू, सिधुदुर्ग जिल्हा बँकेच्या पिगुळी शाखेच्या व्यवस्थापिका पूजा गावडे यांचे दीर, वरचीवाडी वेतोरे येथील माजी सरपंचा सौ.नेहा गावडे यांचे दीर तसेच प्रगतशील शेतकरी संतोष, नितीन ,प्रविण व आपा यांचे बंधू होत.https://sindhudurgsamachar.in/kokan-म्हापणग्रामसभेमध्ये-वि/