⭐ श्री मार्लेश्वर मंदिराची उभारलेली वास्तु संगमेश्वर तालुक्याच्या पर्यटनाला भर देईल
⭐ दोन महिन्यात मारलेश्वर परिसराचा आराखडा तयार करून:- उदय सामंत
संगमेश्वर – संगमेश्वर तालुक्यातील अंगवली येथे श्री मार्लेश्वर देवस्थान देवालयाचे उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी राज्याचे उद्योगमंत्री रत्नागिरी-रायगडचे पालकमंत्री ना.उदयजी सामंत यांनी आज भेट दिली. पालकमंत्री यांच्या हस्ते येथील हॉलचे उदघाटन आणि नाम फलकाचे अनावरण करण्यात आले.हे मंदिर स्वयंभू मंदिर असून यांची स्थापना १९६४ साली झाली आहे. या मंदिराला ६० वर्षे पूर्ण झाले असून जुन्या मंदिराचे जीर्णोद्धार करून येथे सुसज्ज देखणे श्री. मार्लेश्वरचे नवीन मंदिर उभारण्यात आले आहे.https://sindhudurgsamachar.in/देश-विदेश-गरिबीवर-पडदा-pm-म/
या कार्यक्रमला पालकमंत्री उदय सामंत यांनी मार्गदर्शन केले ते म्हणाले, मार्लेश्वरचे आगळे-वेगळे मंदिर आमच्यासाठी प्रेरणादायी आणि ऊर्जादायी ठरणार आहे.श्री मार्लेश्वर मंदिराची उभारलेली वास्तु संगमेश्वर तालुक्याच्या पर्यटनाला भर देईल असा विश्वास व्यक्त करत समस्त अंगावली वासियांना शुभेच्छा दिल्या. दोन महिन्यात मार्लेश्वर परिसराचा आराखडा तयार करून त्याला लागेल तेवढा निधी देणार असल्याचा शब्द पालकमंत्री – उदय सामंत यांनी येथील ग्रामस्थांना दिला.
यावेळी शिवसेना उपनेते सदानंद चव्हाण, आ. शेखर निकम, सचिव संजीवनी आनेराव, संतोष आणेराव, गजानन आणेराव, चंद्रकांत आनेराव, राहुल पंडित, संगमेश्वर तालुकाप्रमुख प्रमोद पवार, रत्नागिरी तालुकाप्रमुख बाबू म्हाप, दत्तात्रय चाळके, युवा उद्योजक सिद्धेश ब्रीद आदी उपस्थित होते.