Kokan: श्री रवळनाथ व परिवार देवता पुनःप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा

0
55
श्री रवळनाथ व परिवार देवता पुनःप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा
श्री रवळनाथ व परिवार देवता पुनःप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा

वेंगुर्ला प्रतिनिधी- तुळस येथील श्री देव रवळनाथ व परिवार देवता पुनःप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा दि.६ ते  ८ जानेवारी या कालावधीत संपन्न होणार आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-घुमटेश्वर-पुनःप्रतिष्ठ/

यानिमित्त दि.६ रोजी सकाळी तरंगदेवतांचे आगमन, यजमान देहशुद्धी, देवतावंदन, गणपती पूजन, पुण्याहवाचन, आयार्चवरण, स्थलशुद्धी, प्रतिष्ठांगभूत देवता आवाहन पूजन, देवता जलाधिवास, अग्निस्थापना, वास्तुयजन, शिखरकलशारोहण, अंगभूत हवन, नैवेद्य, आरती, तीर्थप्रसाद, सायं. ६ वा. रामेश्वर संयुक्त भजन मंडळ वेंगुर्ला यांचे भजन, ७.३० पासून स्थानिकांची भजने, दि.७ रोजी सकाळी स्थलप्राकारशुद्धी, आवाहित देवता पूजन, देवता स्थानविधी, ग्रहयजन, प्रधान होम, वास्तुस्थापना, शिखरकलशारोहण,  नैवेद्य, आरती,  तीर्थप्रसाद, सायं. ६ वा. अचानक मंडळ वेंगुर्ला यांचे भजन, रात्रै ९ वा. जय हनुमान दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग, दि.८ रोजी सकाळी स्थलप्राकारशुद्धी, आवाहित देवतापूजन,  उत्तरांग होम, सकाळी ११ वा. ११ मि. या शुभमुहूर्तावर श्री देव रवळनाथ व परिवार देवतांची स्थापना, देवतांची महापूजा, क्षेत्रपालबलिदान, पूर्णाहूती,  अभिषेक, नैवेद्य,  आरती,  आशीर्वाद ग्रहण, तीर्थप्रसाद, दुपारी १.३० वा. महाप्रसाद, सायं. ६ वा. भजन, रात्रौ ७ वा. गोवर्धन महिला मंडळ राऊळवाडा-तुळस यांचे भजन, रात्रौ ८ वा. स्थानिकांची भजने, रात्रौ ९ वा. नितीन आसयेकर प्रस्तुत भुमिका दशावतार मंडळाचा ‘बाळूमामा‘ हा ट्रिकसिन युक्त नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी दर्शनाचा व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थान मानकरी, देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती व ग्रामस्थ यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here