Kokan : संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयाचा अनागोंदी कारभार

0
178
संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयाचा अनागोंदी कारभार

अधिक अपचारासाठी दाखल झालेलीमाता तीन दिवस उपाशी – – जन्मताच बाळ दगावलेल्या मातेची संगमेश्वर ग्रामिण रूग्णालयाने चालवली क्रूरचेष्टा

या संदर्भात संगमेश्वर तसेच देवरूख ग्रामिण रूग्णालयाची चौकशीची पीडीमहीलेच्या आईची मागणी – –

संगमेश्वर-(विशेष प्रतिनिधी) अभिमन्यू वेंगुर्लेकर

देवरुख ग्रामीण रुग्णालयात बाळंतपणासाठी दाखल झालेल्या महिलेचे बाळ जन्मताच दगावल्याने देवरूख ग्रामीण रुग्णालयाने त्या महिलेला अधिक उपचारासाठी संगमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविले. संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात ३ तारखेला सौ दीपाली सुवरे यांना दाखल करण्यात आले होते. येथे दाखल झाल्यांनतर आज तीन दिवस झाले तरीही रुग्णाच्या जेवण आणि नाश्त्याची सोय जी सरकारमार्फत पुरविली जाते ती आजपर्यंत रुग्णाला देण्यात आली नाही. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-अळंबी-नि-कोळंबी-अळंबीत/

रुग्णाची आई सौ लक्ष्मी मुंडेकर या वयस्कर त्याशिवाय अनोळखी गावात कुणाकडे मदत मागणार? या विचारात असताना ऍम्बुलन्स १०८ चे वाहन चालक श्री काशिनाथ फेपडे यांच्या ही बाब लक्षात येताच त्या महीलेला व तिच्या आईला जेवण पुरवून माणूसकी जोपासली असल्याचे सांगत रूग्णांच्या आई सौ. लक्ष्मी शांताराम मुंडयेकर रा.देवरूख यांनी मीडीयाकडे आपली व्याथा मांडली आहे.

रुग्ण आधीच मानसिक तणावाखाली असताना या दोघीही माय -लेकींना झालेला हा त्रास केवळ ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांचा निष्काळजीपणा असल्याचे दिसून येत आहे. सरकार जाहीर करत असलेल्या या योजना सामान्य माणसाला गरजेच्यावेळी उपलब्ध होत नसतील तर याची दाद कुणाकडे मागायची? रुग्णालयाचे अधिकारी, या सर्वांची जबाबदारी असलेला कर्मचारी आणि मोफत जेवण देण्यासाठी नेमण्यात आलेले श्री.शिंदे यांना या प्रकरणी जाब विचारावा अशी लेखी तक्रार सौ लक्ष्मी मुंडेकर यांनी केली आहे. त्यामुळे या सर्व प्रकाराची आरोग्य यंत्रणे मार्फत चौकशी होणे गरजेचे असून सदर महिलेला न्याय मिळणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here