Kokan : संत राऊळ महाराज महाविद्यालयात २ व ३ रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

0
50
संत राऊळ महाराज महाविद्यालयात २ व ३ रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिर
संत राऊळ महाराज महाविद्यालयात २ व ३ रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

कुडाळ – संत राऊळ महाराज महाविद्यालयात २ व ३ रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात स्टेम आरएक्स संस्थेच्या तज्ञ डॉक्टरांकडून मधुमेह, अस्थिविकार, मेंदूविषयक समस्या, वंध्यत्व, त्वचाविकार, मणक्याचे आजार, नेत्ररोग, दातांच्या समस्या, स्वमग्रता, अतिक्रियशिलता इत्यादी व्याधींवर मोफत तपासणी करण्यात येणार आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-स्पर्धा-परीक्षा-ही-काळाच-2/

दि. २ व ३ सप्टेंबर रोजी स्टेम आरएक्स या संस्थेमार्फत संत राऊळ महाराज महाविद्यालय येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिरात स्टेम आरएक्स संस्थेच्या तज्ञ डॉक्टरांकडून मधुमेह, अस्थिविकार, मेंदूविषयक समस्या, वंध्यत्व, त्वचाविकार, मणक्याचे आजार, नेत्ररोग, दातांच्या समस्या, स्वमग्रता, अतिक्रियशिलता इत्यादी व्याधींवर मोफत मार्गदर्शन तसेच समुपदेशन करण्यात येणार आहे. सदर व्याधीसंबंधी कोणते उपचार घ्यायला हवे तसेच अत्याधुनिक उपचाराच्या संधी कोठे उपलब्ध आहेत.

या सर्व बाबींवर सविस्तर मार्गदर्शन होणार आहे. सदर संस्थेचे संस्थापक डॉ. प्रदीप महाजन हे असून ते अमेरिकन बोर्ड ऑफ रिजनरेटीव मेडीसिन चे डिप्लोमॅट तसेच इंडियाना युनिव्हर्सिटी, अमेरिका येथे ते ॲडजन्क्ट प्रोफेसर म्हणून काम पाहत आहेत.

सदर शिबीर हे दिनांक २ व ३ सप्टेंबर रोजी ११ ते ३ या वेळेत होणार असून जास्तीत जास्त लोकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन स्टेम आरएक्स तसेच महाविद्यालयातर्फे करण्यात आले आहे. ७५०६०४१६३९ या संपर्क क्रमांकावर नोंदणी करून शिबिरात सहभागी व्हावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here