प्रतिनिधी-पांडुशेठ साठम
देवगड : देवगड पोलीस ठाणे मध्ये देवगड कार्यक्षेत्रातील मच्छीमारी सोसायटीचे पदाधिकारी, सागर रक्षक दल, सागर सुरक्षा वार्डन, सागरी किनारी असलेले नागरिक यांना समुद्रकिनारी संशयास्पद मिळालेल्या वस्तूंबाबत तात्काळ पोलीस ठाणे व संबंधित विभागाला कळविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच अशा प्रकारे कोणकोणत्या संशयास्पद वस्तू मिळू शकतात यांची ओळख त्यांना करून देण्यात आलेली आहे. याबाबत सविस्तर प्रचार प्रसार करण्यात येत आहे अशी माहितीनिळकंठ बगळे ,पोलीस निरीक्षक देवगड पोलीस ठाणे यांनी दिली आहे https://sindhudurgsamachar.in/maharashtra-५-सप्टेंबरपूर्वी-सुरु-ह/
तांत्रिक ज्ञानाचा,मनुष्यबळाचा योग्य वापर करता यावा तसेच किनाऱ्यावरील वाढती निगराणी,गस्त ,आणि इतर दालनसोबत संयुक्त किनारी सुरक्षा कवायतींचे आयोजन केले गेले पाहिजे. गुप्त वार्ता दर्जा वाढविणे आणि सागर पोलीस, सागर सुरक्षा वॉर्डन ,सागरी किनारी असलेले नागरिक यांच्यातील समन्वय आणखी सुधारले पाहिजेत असे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे पोलीस निरीक्षक देवगड पोलीस ठाणे यांनी याबाबत दिली.