Kokan: सरमळे गावचे जेष्ठव्यक्तिमत्त्व अर्जुन गुणाजी गावडे यांचा सौ.अर्चनाताई घारे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश.

0
5
अर्जुन गुणाजी गावडे ,सौ.अर्चनाताई घारे,
अर्जुन गुणाजी गावडे यांचा सौ.अर्चनाताई घारे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश. -

🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार –

सावंतवाडी/प्रतिनिधी- देवी भगवतीची व सपतनाथाचे निस्सीम भक्त सरमळेगावचे जेष्ठ व्यक्तिमत्व गावातील प्रत्येकाच्या अडचणीत, सुख दुःखात सामील होणारे असे आदर्श व्यक्तिमत्त्व श्री.अर्जुन गुणाजी गावडे यांचा सौ.अर्चनाताई घारे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. प्रवेश करते वेळी गावडे म्हणाले अर्चना ही आमची मुलगी आहे आणि तिचे आजचे तळागाळातील कार्य पहाता त्यांची वाटचाल ही खूप लोकांना प्रेरणा देणारी व महिलांना आदर्शदायी अशी आहे. त्यामुळे त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्यासाठी आपण कटिबद्ध राहून येत्या विधानसभेसाठी काम करेन. https://sindhudurgsamachar.in/kokan-सम्यक-संबोधी-साहित्य-संस/

यावेळी त्यांच्या समवेत श्री.रामदास सावंत , सावंतवाडी शहराध्यक्ष श्री.देवा टेमकर , नंदकिशोर साटेलकर , विनायक परब , सावंतवाडी विधान सभा युवक अध्यक्ष विवेक गवस व आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here