वेंगुर्ला प्रतिनिधी – रा.प.वेंगुर्ला स्थानकावरील साई मंदिराचा २७वा वर्धापन उत्सव १० व ११ फेब्रुवारी रोजी संपन्न होत आहे.https://sindhudurgsamachar.in/kokan-भ्रष्ट-तलाठ्याला-आ-वैभव
दि.११ रोजी सकाळी श्री गणेश पूजन व धार्मिक विधी, ९ वा.शहरातून साईंची भव्य पालखी मिरवणूक, सायं.४ वा. हळदीकुंकू, सायं.५ वा.ब्राह्मण प्रासादिक मंडळाचे (तेर्सेबांबर्डे) भजन, सायं.६ वा. मातोंड खालचे बांबर मंडळ यांचे भजन, सायं. ७ वा. महाआरती व पालखी, रात्रौ ९ वा. पार्सेकर द.ना. मंडळाचा ‘वेड्या बहिणीची वेडी माया‘ हा नाट्यप्रयोग, दि.११ रोजी महारुद्र व जप सांगता, साईबाबांची महापूजा, ११ वा.महाआरती व महानैवेद्य, दु.१२ ते ४ पर्यंत महाप्रसाद, सायं. ४ वा. श्री सिद्धेश्वर महिला मंडळाचे (खानोली) भजन, सायं. ५ वा. गुणगौरव कार्यक्रम, सायं. ७ वा. महाआरती, सायं. ७.३० वा. पालखी मिरवणूक, रात्रौ ९ वा. देवेंद्र नाईक प्रस्तुत चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळ, चेंदवण यांचा ‘ब्रह्म पदार्थ‘ अर्थात ‘महिमा जगन्नाथ पुरीचा‘ हा रहस्यमय ट्रिकसिनयुक्त नाट्यप्रयोग होणार आहे. तरी भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री साई मंदिर देवस्थान समिती व कर्मचारी वृंद रा.प.वेंगुर्ला आगार यांनी केले आहे.