⭐कोकणात सर्व काही असून सुध्दा येथील जनता उपेक्षित का? असा सवाल करीत आता पवारांशिवाय या ठिकाणी पर्याय नाही- सौ.अर्चना घारे
दोडामार्ग, ता. २७: येणाऱ्या काळात सावंतवाडीत राष्ट्रवादीला गतवैभव नक्कीच मिळेल, असा विश्वास आजच्या मेळाव्यात राष्ट्रवादीच्या महिला नेत्या अर्चना घारे यांनी व्यक्त केला. दरम्यान कोकणवासीयांसाठी काही तरी करायचे आहे. त्याचा रोजगाराचा, आरोग्याचा प्रश्न सोडवायचा आहे. त्यादृष्टीने आमची वाटचाल सुरू आहे. येणाऱ्या काळात पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे हात नक्कीच बळकट करू, असेही त्यांनी सांगितले. राष्ट्रवादीच्या महिला नेत्या सौ. अर्चना घारे यांच्या उपस्थितीत दोडामार्ग येथे आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, जिल्हाध्यक्ष अमित सामंत, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, महिला जिल्हाध्यक्ष रेवती राणे, युवती जिल्हाध्यक्ष सावली पाटकर, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, देवा टेमकर, हिदायतुल्ला खान, याकुब शेख, प्रसाद रेगे, नदीप चांदेकर, नम्रता कुबल, शेखर माने, सुरेश दळवी, व्हिक्टर डॉन्टस, राबिया शेख, इफ्तिकार राजगुरू, समीर सातार्डेकर, मारिया फर्नांडिस, गौरी गावडे आदी उपस्थित होते. https://sindhudurgsamachar.in/kokan-राष्ट्रवादीकाॅग्रेस-पा/
यावेळी अर्चना घारे म्हणाल्या, सौ. सुळे आज प्रथमच दोडामार्ग मध्ये आल्या आहेत. त्यांना या ठिकाणी आल्यानंतर येथील घरे, निसर्ग आवडला. राष्ट्रवादी आणि कोकण हे वेगळे नाते आहे. फलोत्पादन योजना राबवून पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी कोकणची ओळख बदलली. निसर्गाने कोकणाला भरभरून दिले. परंतु या ठिकाणी रोजगार नसल्यामुळे मुलांना अन्य ठिकाणी जावे लागत आहे. त्यामुळे आडाळी एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लागणे गरजेचे आहे. आरोग्याचा प्रश्न आहे. अनेकांना – साधी औषधे सुध्दा मिळत नाही. हत्तीचा प्रश्न, पर्यटनाचा प्रश्न मार्गी लागणे गरजेचे आहे.
कोकणात सर्व काही असून सुध्दा येथील जनता उपेक्षित का? असा सवाल करीत आता पवारांशिवाय या ठिकाणी पर्याय नाही. त्यामुळे या ठिकाणी संघटना बांधून राष्ट्रवादीचे गतवैभव पुन्हा नक्कीच मिळेल, असा विश्वास घारे यांनी व्यक्त केला. आपल्या कोकणवासीयांसाठी काही तरी करायच आहे. त्या दृष्टीने आमचे काम सुरू असून पुढच्या काळात नक्कीच बदल दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी सुरेश दळवी म्हणाले, या ठिकाणी अर्चना घारे नक्कीच निवडून येतील. त्यांचे हात बळकट करणे गरजेचे आहे. सामाजिक बांधिलकीची त्यांना पुर्ण जाणीव आहे. लोकांचे प्रश्न त्यांना अवगत आहेत. त्यामुळे महिला म्हणून पक्षाने त्यांना संधी द्यावी