Kokan: सावंतवाडी मतदारसंघातून दीपक केसरकर ३९७२७ मतांनी विजयी

0
17
दीपक केसरकर ३९७२७ मतांनी विजयी
सावंतवाडी मतदारसंघातून दीपक केसरकर ३९७२७ मतांनी विजयी

⏩🟣 विधानसभा निकाल २०२४ Live

सावंतवाडी विधानसभा तेवीसावी फेरी- (पोस्टल मते) –https://sindhudurgsamachar.in/kokan-वालावल-हुमरमळा-येथील-बि-ए/

सावंतवाडी मतदारसंघातून तेवीसाव्या फेरीअखेर दीपक केसरकर ३९७२७ मतांनी विजयी.

अपेक्षेप्रमाणे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आघाडी घेत आपल्या सावंतवाडी मतदारसंघावर तब्बल चौथ्यांदा आपले नाव कोरले. तर ठाकरे शिवसेनेचे राजन तेली यांना पराभव पत्करावा. अपक्ष म्हणून रिंगणात असलेले भाजपचे बंडखोर विशाल परब यांनी कडवी झुंज दिली तर दुसऱ्या अपक्ष अर्चना घारे यांना मात्र समाधान मानावे लागले.

सावंतवाडी मतदारसंघातील निवडणूक प्रक्रिया ही चुरशीची पाहायला मिळाली. तब्बल चार बलाढ्य उमेदवार या ठिकाणी उभे असल्यामुळे नेमका कोण विजयी होतो? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आपल्या विजयाचा चौकार मारला. या ठिकाणी शिवसेना विरुद्ध ठाकरे शिवसेना अशी लढत होण्याची शक्यता होती परंतु दीपक केसरकर यांनी त्या ठिकाणी एकतर्फी विजय मिळवला.

दिपक केसरकर- ४४८ (८०३८९)
राजन तेली- २९० (४०६६२)
अर्चना घारे- ३१ (६०१९)
दत्ताराम गावकर- ८ (१२१३)
विशाल परब- ५१ (३३०५१)
सुनिल पेडणेकर- ३ (८९१)
नोटा- ११ (२३५७)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here