Kokan: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे माकडांपासून होणाऱ्या नुकसानीबाबत आमदार वैभव नाईक यांनी वेधले वनमंत्र्यांचे लक्ष

0
26
सिंधुदुर्ग,माकडांपासून होणाऱ्या नुकसानीबाबत ,
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे माकडांपासून होणाऱ्या नुकसानीबाबत आमदार वैभव नाईक यांनी वेधले वनमंत्र्यांचे लक्ष

पोलीसांच्या ताब्यात असलेल्या शेती संरक्षक बंदुका वारसांच्या ताब्यात देण्यात याव्यात – आमदार वैभव नाईक

विधानभवन, मुंबई येथे हिवाळी अधिवेशना दरम्यान वन्यजीवांपासून होणाऱ्या नुकसानीच्या आढावाबाबत वनमंत्र्यांसोबत बैठक संपन्न

पांडुशेठ साटम

मुंबई- पावसाळी अधिवेशना दरम्यान विधान भवन मुंबई येथे वन्यजीवांपासून होणाऱ्या नुकसानीच्या आढावाबाबत वनमंत्र्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये वन विभाग, प्रधान सचिव मा. वेणूगोपाल रेड्डी हे देखील उपस्थित होते. या बैठकीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे माकडांपासून होणाऱ्या नुकसानीबाबत आमदार वैभव नाईक यांनी प्रश्न उपस्थित केला. https://sindhudurgsamachar.in/kokan-आरोही-मुलूख-शिष्यवृत्ती/

माकडांमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी त्रस्त झाले आहेत. यावर मंत्री मा. सुधीर मुनगंटीवार यांनी योग्य उपाययोजना करण्याचे आदेश मा. प्रधान सचिव, वेणूगोपाल रेड्डी यांना दिले. त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील पोलिसांच्या ताब्यात असलेल्या शेती संरक्षक बंदूकांबाबत देखील आमदार वैभव नाईक यांनी मा. वनमंत्री यांना विचारणा केली. सदर शेती संरक्षक बंदुका वारसांच्या ताब्यात देण्याबाबत आमदार वैभव नाईक यांनी मा. मंत्री महोदयांना मा. गृहमंत्री यांच्यासोबत बैठक आयोजित करण्याबाबत विनंती केली. सदर बैठक लवकरात लवकर आयोजित करण्याचे आश्वासन मंत्री मुनगंटीवार यांनी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here