Kokan: सिंधुदुर्ग जिल्ह्यात पायाभूत विद्युत सुविधा बळकटीकरण,विद्युत वाहिन्या भूमिगतीकरणाची 1 हजार 982 कोटींची कामे

0
68
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ घ्या

कोकण परिमंडळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुनरूत्थान वितरण क्षेत्र योजना (आरडीएसएस), राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्प, कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पाच्या माध्यमातून पायाभूत विद्युत सुविधा बळकटीकरण व विद्युत वाहिन्या भूमिगतीकरणाची 1 हजार 982 कोटी 84 लक्ष रूपयांची कामे प्रस्तावित आहेत. त्यात 11 नवीन 33/11 केव्ही उपकेंद्रे, 6 अतिरिक्त उपकेंद्र रोहित्रांची उभारणी, नवीन वितरण रोहित्रे, नवीन उच्च व लघुदाब वाहिनी, विद्युत खांब व रोहित्र पेट्या बदलणे, फिडर विलगीकरण, स्मार्ट मीटरिंग, उपरी विद्युत वाहिन्या भूमिगत करणे इत्यादी कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे ग्राहकांची वाढती विजेची मागणी लक्षात घेऊन ग्राहकांना अखंडित व दर्जेदार वीजपुरवठा होण्यास मदत होणार आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-भ्रष्ट-तलाठ्याला-आ-वैभव

पुनरूत्थान वितरण क्षेत्र योजना (आरडीएसएस)

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरडीएसएस योजनेतून 1174 कोटी 94 लक्ष निधीतून विद्युत यंत्रणेच्या बळकटीकरण व विस्तारीकरणाची कामे प्रस्तावित आहेत. कुडाळ एमआयडीसी, पणदूर, पावशी, आंब्रड, वाफोली, निरवडे, वेंगुर्ला, वझरे, घोटणे, शिरगाव, तळेरे कासर्डे या 11 ठिकाणी 33/11 केव्ही नवीन उपकेंद्रे होणार आहेत. आडेली, सागरतीर्थ, कोणाळकट्टा, सासोली, आंबोली, सांगवे या 33/11 केव्ही उपकेंद्रात नवीन अतिरिक्त रोहित्र बसविण्याची कामे प्रस्तावित आहेत. जिल्ह्यात 499 वितरण रोहित्रे, 374 वितरण रोहित्रांची क्षमता वृध्दी, 735 किलोमीटर नवीन विद्युत वाहिनी त्यात 536 किमी उच्च व 199 किमी लघुदाब वाहिनी, 3944 जीर्ण विद्युत खांब व 1234 नादुरुस्त रोहित्र पेट्या बदलणे अशी कामे प्रस्तावित आहेत. 16 कृषी फीडरचे विलगीकरण, वीजहानी कमी करण्यासाठी एरियल बंच केबल टाकणे, उच्चदाब विद्युत वाहिनीत सुधारणा, वाहिन्यांचे भूमिगतीकरण इ. कामे प्रस्तावित आहेत. ग्राहकांना स्मार्ट मीटर बसविण्यात येणार आहेत.

कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पात 500 कोटी रूपये निधीची कामे

कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पातून 500 कोटी रुपयांचा निधी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत महावितरणला वितरीत करण्यात आलेला आहे. या प्रकल्पातून देवगड (106.28 कोटी), मालवण (94.97 कोटी), आचरा (91.81 कोटी), वेंगुर्ला (96.89 कोटी) व कुडाळ (109.88 कोटी) या भागातील विद्युत वाहिन्या भूमिगत करण्याचे काम करण्यात येणार आहे. वेंगुर्ला, देवगड, मालवण या भागासाठी विद्युत यंत्रणेच्या देखभाल दुरुस्तीसाठी स्वतंत्र वाहने उपलब्ध करण्यात येणार आहेत.

राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्प

राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पांतर्गत 302 कोटी 91 लक्ष रुपयांचा विद्युत कामांचा प्रकल्प आराखडा मंजूर आहे. त्यात चिपी विमानतळ येथे एक नवीन 33/11 केव्ही उपकेंद्र प्रस्तावित आहे. देवगड, मालवण, आचरा, वेंगुर्ला व कुडाळ या भागातील विद्युत वाहिन्या भूमिगत करण्याचे काम करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here