वेंगुर्ला प्रतिनिधी– वाढत्या महागाईमुळे महिला प्रचंड मेटाकुटीला आल्या आहेत. अनेक महिलांचे आर्थिक उत्पन्न काहीच नसल्याने त्यांना पुरूष मंडळींवर अवलंबून रहावे लागत आहे. त्यामुळे लाडकी बहिण योजनेतून मिळणारे दीड हजार रूपये महिलेला आर्थिक मदत करू शकणार असल्याने अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पातील ही योजना क्रांतीकारी ठरणार असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष प्रज्ञा परब यांनी व्यक्त केली आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-मारहाण-प्रकरणातील-संशयी/
दरम्यान, केंद्र सरकारने फौजदारी कायद्यात बदल करून 1 जुलैपासून नविन कायदा अंमलात आणला आहे. यात महिलांवरील अत्याचार, विनयभंग, हुंडाबळी, लैंगिक शोषण अशा कायद्यांमध्ये फारच चांगली सुधारणा केलेली आहे. या नविन कायद्यांमुळे महिलांवरील अत्याचार कमी होईल व त्यांना संरक्षण मिळेल असा आशावाद व्यक्त करीत महिलांना हितकारक अशा योजनेची अंमलबजावणी केल्याबद्दल सिंधुदुर्ग महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, गृहमंत्री अमित शहा व केंद्र सरकारचे आभार मानत असल्याचे प्रज्ञा परब यांनी सांगितले.
फोटो – प्रज्ञा परब