
🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l कणकवली –
कलमठ बँक कॉलनी येथे सिंधुरत्न फाऊंडेशन च्या अध्यक्ष्या अभिनेत्री सौ अक्षता कांबळी यांनी फाउंडेशन च्या महिलांसह शिवजयंती उत्सव साजरा केला.यावेळी सिंधुरत्न च्या अध्यक्षा अभिनेत्री सौ अक्षता कांबळी यांनी उपस्थित महिलांशी महाराजांच्या विचारांची देवाण घेवाण केली. https://sindhudurgsamachar.in/kokan-बाजार-समितीचा-परवाना-घेऊ/
शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलं. युद्ध हे त्यांचं साधन होत. त्यांनी अनेक गनिमेकावे केले पण ते फक्त स्वराज्यासाठीच केले. म्हणूनच त्यांची पूजा केली जाते. शिवजयंती हा उत्सव सण म्हणून घराघरात साजरा व्हावा असे आव्हान केले .यावेळी सौ लक्ष्मी गवस,सौ मिलन पाटील,सौ श्रद्धा पाटील, जान्हवी रावण,चैताली राणे,अर्चना राणे, सागर पाटील, रविकिरण शिरवलकर, श्याम सामंत,सिद्धेश कांबळी, अनुज कांबळी अनिल कांबळी इत्यादी उपस्थित होते .