Kokan: सिनेट निवडणुकांचे निकाल ही भविष्याची नांदी

0
28
मंदार शिरसाट
सिनेट निवडणुकांचे निकाल ही भविष्याची नांदी

पंचायत समितीच्या निवडणुकात काय निकाल लागणार आहेत, त्याचा हा ट्रेलरआहे- मंदार शिरसाट

कुडाळ/प्रतिनिधी , दि – २८:– मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे दहापैकी दहा उमेदवार निवडून आले. विद्यापीठापासून दिल्लीपर्यंत मूळ शिवसेनेचा म्हणजे ठाकरेंचाच आवाज बुलंद आहे यावर या निकालाने शिक्कामोर्तब केले आहे. शिवसेनेत कितीही फूट पाडली, कितीही आमदार आणि नगरसेवक फोडले तरी सामान्य माणूस हा कालही ठाकरेंबरोबर होता, आजही ठाकरेंबरोबर आहे आणि उद्याही ठाकरेंबरोबरच असेल हेच, या निकालाने स्पष्ट केले आहे. आगामी विधानसभा आणि जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुकात काय निकाल लागणार आहेत, त्याचा हा ट्रेलर असल्याचे युवा सेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांनी म्हटले आहे. https://sindhudurgsamachar.in/latest-e-paper/

सत्ताधारी भाजपा हा निवडणुकांना घाबरणारा पक्ष आहे. सगळ्या निवडणुका टाळून, लांबणीवर टाकून स्वतः कारभार हाकायचा ही भाजपाची रणनीती आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मुदती संपून दोन वर्षे उलटून गेली तरी निवडणुका घेण्याचे धाडस भाजपाला झालेले नाही. थापेबाजी, भ्रष्टाचार, गद्दारी यामुळे जनतेच्या मनात तीव्र रोष निर्माण झाला आहे. तो उफाळून येण्याची भीती भाजप नेतृत्वाला सातत्याने वाटते आहे. म्हणूनच सगळ्या निवडणुका लांबणीवर टाकल्या जात आहेत हे सामान्य जनता समजून चुकली आहे. ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका सुद्धा भाजपने निवडणूक आयोगाला हाताशी धरून पुढे ढकलले आहेत. निवडणुका कितीही लांब गेल्या तरी त्याचा मोठा फटका भाजप आणि शिंदे गटालाच बसणार आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणुका लांबीवर टाकण्याचे जसे राजकारण भाजपने खेळले तसेच ते सिनेट निवडणुकांमध्येही खेळण्यात आले होते.असे युवा शिवसेना नेते मंदार शिरसाट सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here