🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l कुडाळ l गोपाळ पावसकर- –
कै. एल. एम. नाईक स्मृती प्रीत्यर्थ *साद फाउंडेशन आयोजित व्हॅलेंटाईन डे निमित्त शाहिद जवानास पत्र लेखनाचा आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला होता.मागील तीन वर्ष साद फाउंडेशन च्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात.ह्या वर्षी शाहिद जवानास प्रेम पत्र ह्या विषयावर अनेकांचा प्रतिसाद मिळाला.https://sindhudurgsamachar.in/latest-e-paper/
1)प्रथम क्रमांक – शशिकांत तांबे (फोंडाघाट,कणकवली )
2)द्वितीय क्रमांक – विभागून तनया पाटील(सावंतवाडी )
श्रुती राऊळ(सावंतवाडी )
3) तृतीय क्रमांक श्रेयस शिंदे (कणकवली )
उत्तेजनार्थ – 1)पल्लवी शिंदे माने (युनाइटेड स्टेट ऑफ अमेरिका )
2)आर्या बागवे -ओरोस. विजेत्यांना ट्रॉफी सन्मान पत्र रोख रक्कम तसेच सहभाग घेणाऱ्यांना सन्मान पत्र व भेट वस्तू साहित्यिक संजय तांबे यांच्या आई-वडिलांच्या स्मरणार्थ देण्यातआल्या. सर्व विजेत्याना अभिनेत्री कांबळी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. साद फाउंडेशनच्या संस्थापिका मा. लतिका नाईक, साद फाउंडेशनच्या प्रशासकीय अधिकारी गीतांजली नाईक तसेच सचिव सचिन कोरलेकर यांना सौ कांबळी यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत मालवणी भाषेतून मनोगत व्यक्त केले उपस्थित सर्व भारावून गेले.