Kokan: सुरक्षित दिवाळीसाठी महावितरणचा विद्युत सुरक्षा संदेश

0
33
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ घ्या

कोकण परिमंडळ : घरात वा व्यवसायाच्या ठिकाणी दिवाळीचीसजावट, विद्युत रोषणाई तसेच फटाक्यांची आतषबाजी करताना ग्राहकांनी विद्युत सुरक्षेची काळजी घ्यावी, असे महावितरणचे आवाहन आहे. https://sindhudurgsamachar.in/मनोरंजन-बाल-दिवसाचं-औचित/

विद्युत रोषणाई,फटाक्यांची आतषबाजी करताना महावितरणच्या उच्च व लघुदाब विद्युत वाहिन्या, विद्युत खांब, वितरण रोहित्रे, उपकेंद्रे इ. सार्वजनिक विद्युत यंत्रणेपासून पासून सुरक्षित अंतर राखावे. मोकळ्या जागेत फटाके उडवावेत. घर किंवा इमारतीचे अर्थिंग योग्य असल्याची तपासणी करावी. सुरक्षेच्या दृष्टीने विद्युत मांडणीत अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर्स बसवून घ्यावे. विद्युत रोषणाई करण्यासाठी वापरली जाणारी विद्युत दिव्यांची माळेची वायर्स तपासून घ्यावी. थ्री पिन प्लग व सॉकेटचा वापर करावा. आकाशकंदीलासाठी जोड वायर्स वापरणे टाळावे, जोड वायर्स वापरताना योग्य दर्जाच्या इन्सुलेशन टेपने ती सुरक्षित करून घ्यावी.

विद्युत यंत्रणेस आग लागल्यास, काही धोका निर्माण झाल्यास अथवा वीजपुरवठा खंडित झाल्यास महावितरणच्या मध्यवर्ती ग्राहक सुविधा केंद्राच्या टोल फ्री क्रमांकावर १८००-२१२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ किंवा १९१२ संपर्क साधावा.

                                                            ———–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here