Kokan: सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक भविष्यनिर्वाह निधी मिळण्याची मागणी

0
38
सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक भविष्यनिर्वाह निधी
सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक भविष्यनिर्वाह निधी देह हप्त्यापासून वंचित राहिले असून ती रक्कम मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे.

वेंगुर्ला प्रतिनिधी – सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक भविष्यनिर्वाह निधी देह हप्त्यापासून वंचित राहिले असून ती रक्कम मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे.

सर्व निवृत्त राज्य कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग भविष्य निर्वाह निधी फरकाची रक्कम ५ हप्त्यामध्ये द्यावयाची आहे. पेकी ३ हप्ते प्राथमिक शिक्षक वगळता सर्व राज्य कर्मचा-यांना मिळालेले आहेत. पण प्राथमिक शिक्षकांना मात्र, आजपर्यंत दोनच हप्ते प्राप्त आहेत. तिसरा हप्ता अद्याप प्राप्त नाही. अन्य सर्व कर्मचा-यांना हा तिसरा हप्ता शासनाने दिला आहे. माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना ही रक्कम दि. ३० जून २०२२ रोजी त्यांचे बँक खात्यात जमा झालेली आहे. फक्त प्राथमिक शिक्षकच वंचित का? याची चौकशी झालीच पाहिजे. वेगवान निर्णय घेणा-या मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालावे व प्राथमिक शिक्षकांना सदरहू रक्कम मिळावी अशी मागणी केली आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-समर-कॅम्पमध्ये-फिटनेसबा/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here