वेंगुर्ला /प्रतिनिधी- वेंगुर्ला पंचायत समितीमधील सेवानिवृत्त कर्मचारी व उभादांडा-नवाबाग येथील मुळ रहिवासी व वेंगुर्ला शहरातील परुळेकर गल्ली येथील निवासी सौ. राजलक्ष्मी राजन मुणनकर (६४) यांचे २३ सप्टेंबर रोजी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. https://sindhudurgsamachar.in/kokan-उबाटा-युवासेना-गटामध्ये/
सर्व कर्मचारी, लाभार्थी यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या कार्य तत्परमुळे गेली काही वर्षे पंचायत समितीत घरकुल योजनेचे कामकाज पाहत होत्या. त्यांचे पश्चात पती, दोन मुली, भाऊ असा परिवार आहे. तिलारी पाटबंधारे विभागातून सेवानिवृत्त झालेले अभियंता राजन मुणनकर यांच्या पत्नी तर वेंगुर्ला शहरात रिक्षा व्यवसाय करणारे सुधीर मांजरेकर व अनिल मांजरेकर यांची ती बहिण होय.