Kokan: ‘स्वच्छ भारत’ अभियान अंतर्गत विद्यार्थ्यांनी बनविल्या टाकाऊतून टिकाऊ वस्तू

1
15
'स्वच्छ भारत' अभियान
'स्वच्छ भारत' अभियान अंतर्गत विद्यार्थ्यांनी बनविल्या टाकाऊतून टिकाऊ वस्तू

वेंगुर्ला /प्रतिनिधी- स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत ‘स्वच्छता ही सेवा‘ निमित्त वेंगुर्ला नगरपरिषदेने घेतलेल्या कच-यातील टाकाऊ वस्तूंपासून टिकावू व आकर्षक कलाकृतींवर आधारीत स्पर्धेत मोठ्या गटातून मकरंद वेंगुर्लेकर व संस्कार शारब्रिदे तर लहान गटातून कु. आराध्या मुणनकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. https://sindhudurgsamachar.in/latest-e-paper/

ही स्पर्धा २५ सप्टेंबर रोजी नगरपरिषदेच्या स्वामी विवेकानंद सभागृहात दन गटात घेण्यात आली. पहिली ते पाचवी गटामध्ये ७८ स्पर्धक सहभागी झाले होते. यात प्रथम-आराध्या मुणनकर-शिपल्यापासून मेणबत्तीची कलाकृती, द्वितीय-सिया गावडे-करवंटी, लाकडी वस्तू व प्लॅस्टिकचा वापर करून शोभीवंत कलाकृती, तृतीय-श्रेयांश सावंत-काचेच्या बॉटल व कागदी पुठ्यावर नक्षीकाम (सर्व (सिधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडियम स्कूल)सहावी ते दहावी गटामध्ये २७ स्पर्धक सहभागी झाले होते. यात प्रथम-मकरंद वेंगुर्लेकर व संस्कार शारबिद्रे-प्लॅस्टिक बॉटल व पुठ्ठयांचा वापर करून ७० किलो वजन क्षमतेची खुर्ची (पाटकर हायस्कूल), द्वितीय-काव्या कुडाळकर-लाकडी वस्तू व टाकाऊ जाळी, नायलॉल दोरी व कागद यांच्या सहाय्याने नौका, तृतीय-आर्या चेंदवणकर-प्लॅस्टिक बॉटलपासून कलाकृती (दोन्ही एम.आर.देसाई इंग्लिश स्कूल). सर्व स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. https://sindhudurgsamachar.in/kokan-शिवसेना-बांधकाम-कामगार-स/

फोटोओळी – कच-यातील टाकाऊ वस्तूंपासून टिकावू व आकर्षक कलाकृतींवर आधारीत स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना गौरविण्यात आले.

1 COMMENT

  1. […] यात कर्मचा-यांचे आरोग्य, रक्ताच्या विविध चाचण्या आणि आरोग्य विषयक इतर तपासण्या करण्यात आल्या. तपासणीनंतर आवश्यकतेनुसार औषधेही देण्यात आली. तसेच प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना आणि आयुष्यमान भारत कार्ड यांसारख्या योजनांचा लाभ देण्यात आला. याशिवाय इतर शासकीय योजनांची माहिती देखील कर्मचा-यांना देण्यात आली. त्यानंतर कमर्चा-यांना सुरक्षा उपकरणे आणि ओळखपत्रे वाटप करण्यात आली. https://sindhudurgsamachar.in/kokan-स्वच्छ-भारत-अभियान-अंतर/ […]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here