लवकरच गावागावात “होऊ दे चर्चा” कार्यक्रम राबविणार -संजय पडते; महागाईचा रोष महिला मतदानातून व्यक्त करतील -जान्हवी सावंत
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कुडाळ तालुका कार्यकारिणीची बैठक संपन्न
प्रतिनिधी- पांडुशेठ साठम
कुडाळ- कुडाळ मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या या आधीच्या लोकप्रतिनिधीने सत्तेसाठी आणि स्वतःच्या स्वार्थासाठी अनेक पक्षांशी गद्दारी केली. मात्र कुडाळच्या जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली. निवडणूक आली कि पक्ष बदलायचा आणि विकासाच्या खोट्या वल्गना करायच्या हा विरोधकांचा धंदा आहे. आता सत्तेत असताना विकास करण्यापासून त्यांचे हात कोणी बांधले आहेत? मलाही अनेक आमिषे देण्यात आली परंतु शिवसेनेशी असलेली निष्ठा आणि जनतेने दोन वेळा दाखवलेल्या विश्वासास मी तडा जाऊ दिला नाही,आणि देणारही नाही. आता जे कोणी उमेदवार म्हणून फिरतायत त्यांना जनतेने याआधी ५ वर्षे संधी दिली होती. मात्र ते जनतेच्या विश्वासास पात्र ठरले नाहीत. त्यांच्या माध्यमातून झालेले एकही काम जनतेला आठवत नाही.मी जे काही काम केले आहे ते जनतेच्या डोळ्यासमोर आहे. आम्ही मंजूर केलेल्या कामांना स्थगिती देण्याचे काम या सरकारने केले आहे. राणेंची धडपड खाजगी विकासासाठी सुरु आहे. याआधी सत्तेच्या माध्यमातून पडवे येथे खाजगी हॉस्पिटल सुरु केले. आता त्या हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रस्त्याच्या ४ कोटीच्या कामावर असलेली स्थगिती उठविण्यात आली. मात्र छोट्या छोट्या रस्त्यांवर अजूनही स्थगिती आहे. याउलट उद्धवजी मुख्यमंत्री असताना आम्ही पाठपुरावा करून शासकीय मेडिकल कॉलेज, शासकीय महिला बाल रुग्णालय सुरु करून दाखवले. त्यामुळे केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष बदलणाऱ्यांना कुडाळची जनता स्वीकारत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध होईल असे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले. https://sindhudurgsamachar.in/kokan-गणेश-चतुर्थीपूर्वी-आंबा/
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कुडाळ तालुका कार्यकारिणीची बैठक आज कुडाळ महालक्ष्मी हॉल येथे संपन्न झाली. यावेळी आ. वैभव नाईक बोलत होते. बैठकीला शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती. यावेळी संजय पडते म्हणाले, लोकप्रतिनिधी म्हणून आ.वैभव नाईक चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. सत्तेत येण्यासाठी अनेक आमिषे त्यांना आली तरी त्यांनी पक्षाशी आणि ठाकरे परिवाराशी असलेली निष्ठा सोडली नाही.इतर आमदार वेगवेगळ्या अमिषाला बळी पडले असले तरी वैभव नाईक निष्ठावंत राहिले याचा आम्हाला अभिमान आहे. कुडाळ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. शिवसेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याने लोकांपर्यंत पोचून लोकांचे प्रश्न लोक प्रतिनिधींच्या माध्यमातून सोडवावेत आणि बालेकिल्ला अबाधित ठेवावा. शिवसेनेच्या माध्यमातून लवकरच गावागावात होऊ दे चर्चा हा कार्यक्रम राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सौ. जान्हवी सावंत म्हणाल्या कोरोना काळात आमदार वैभव नाईक जीवाची पर्वा न करता लोकांना मदत करण्यासाठी गावोगावी फिरत होते. हे जनता विसारणार नाही. प्रत्येक दिवशी त्यांच्या माध्यमातुन लोक हिताचे काम होत आहे. उद्धवजी ठाकरे यांनी कोरोना काळात महाराष्ट्राला उत्तम रित्या सांभाळले. आरोग्य व्यवस्थेला बळकटी दिली. मात्र आताचे सरकार पक्ष फोडाफोडीचे काम करत आहे. त्यांना केवळ सत्ता पाहिजे जनतेशी त्यांना काहीही देणेघेणे नाही. महागाईचा भडका उडाला असताना सरकार मधील कोणीही त्यावर बोलत नाही. घर चालवताना महिला मेटाकुटीस आल्या असून निवडणुकीत मतदानाच्या रूपाने आपला रोष त्या व्यक्त करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ तालुका प्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे,कुडाळ शिवसेनेचे नेते अतुल बंगे, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट,ओबीसी सेल जिल्हाप्रमुख रुपेश पावसकर, उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, उपतालुकाप्रमुख बाळा कोरगावकर,शहर प्रमुख संतोष शिरसाट,उपसभापती जयभारत पालव, उपनगराध्यक्ष किरण शिंदे, युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी,महिला तालुकाप्रमुख स्नेहा दळवी,सुशील चिंदरकर,राजू गवंडे, राजू कविटकर, दीपक आंगणे, नरेंद्र राणे, नागेश ओरोस्कर, विकास राऊळ, महेश सावंत, मिलिंद नाईक,गंगाराम सडवेलकर, सुधीर राऊळ,संदीप सावंत, शेखर गावडे, अजित परब, संदेश प्रभू,नगरसेवक उदय मांजरेकर,नगरसेविका ज्योती जळवी, श्रुती वर्दम, आरोही चव्हाण,अमित राणे, सागर भोगटे,चंदू मुंडये,रुपेश वाडयेकर, सचिन गावडे, मिलिंद नाईक,विनय गावडे,काका गावडे,अजित परब, मुकुंद सरनोबत, अशपाक कुडाळकर,बापू बागवे,दिनेश वारंग, लक्ष्मण घाडीगावकर, नरेंद्र राणे,बाजीराव झेंडे,वैशाली पारकर, समीक्षा जाधव,दक्षता मेस्त्री, वेदिका दळवी,प्राची सावंत,अनघा तेंडोलकर,भक्ती घाडीगावकर,गौतमी कासकर,गुरु गडकर आदींसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.