Kokan: स्वरचित काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन

0
102
स्वरचित काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन
स्वरचित काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन

वेंगुर्ला प्रतिनिधी – येथील नगरवाचनालय संस्थेतर्फे कै.सौ.कुमुदिनी गुरूनाथ सौदागर स्मृती अनिल श्रीकृष्ण सौदागर पुरस्कृत स्वरचित काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा सिधुदुर्ग जिल्हा मर्यादित आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-फसवणूक-करणाऱ्या-बिल्डरल/

स्पर्धकाने स्वरचित एक कविता कागदाच्या एकाच बाजूस लिहून अगर टाईप करून पाठवायची आहे. काव्य दीर्घ असू नये याची कवींनी नोंद घ्यावी. आपण पाठविलेली कविता ही स्वतःचीच असल्याचे घोषणापत्र संबंधिताने जोडणे बंधनकारक आहे. कविता ३१ डिसेंबरपर्यंत संस्थेच्या कार्यालयात पोहोचतील अशा टपालाने अथवा स्वतः कार्यालयीन वेळेत अथवा ta6606001@gmail.com या ईमेलवर पाठवावी.

आलेल्या स्वरचित कवितांपैकी समितीने निवडलेल्या २५ कवितांचे वाचन करण्यासाठी कवींना निमंत्रित करण्यात येईल. २५ कवितांच्या वाचनानंतर त्या २५ कविता तसेच इतर उल्लेखनीय कवितांचा कवितासंग्रह संस्था पुस्तिकेतून प्रसिद्ध करणार आहेत. प्रत्यक्ष सादरीकरणानंतर प्रथम तीन क्रमांकांना रोख ३००१, २००१ व १००१ अशी बक्षिसे देण्यात येतील. अधिक माहितीसाठी प्रत्यक्ष किवा ८२७५६६७०९० यावर संफ साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here