Kokan: ‘स्वीप’ अंतर्गत चंद्रनगर शाळेत चित्रकला स्पर्धा

0
115
'स्वीप' ,
'स्वीप' अंतर्गत चंद्रनगर शाळेत चित्रकला स्पर्धा

दापोली- ‘स्वीप’ अंतर्गत मतदार जनजागृती अभियानाचा एक उपक्रम म्हणून दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद चंद्रनगर शाळेत नुकतेच शालेय स्तरावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता पहिली ते पाचवी आणि इयत्ता सहावी ते सातवी अशा दोन गटांत ही स्पर्धा घेण्यात आली. https://sindhudurgsamachar.in/kokan-विलवडेत-हाँट-मिक्सर-वाहण/

‘स्वीप’ अंतर्गत सध्या ग्रामीण व शहरी भागात मतदार जनजागृती होण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. 32- रायगड लोकसभा मतदारसंघातही शासन स्तरावर मतदानाचा टक्का वाढण्यासाठी व जनजागृती होण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याच अभियानाचा भाग म्हणून रायगड लोकसभा मतदारसंघात सर्वत्र सर्व माध्यम व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन होत आहे. चंद्रनगर शाळेत नुकतेच शालेय स्तरावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मतदार राजा जागा हो, माझे मत, श्रेष्ठ मत, चला मतदान करुया, मतदानाचे महत्त्व आदी विषयांवर शाळेत सहभागी विद्यार्थ्यांनी चित्रे काढून स्पर्धेत सहभाग घेतला.

इयत्ता पहिली ते पाचवी आणि सहावी ते सातवी अशा दोन गटांत ही स्पर्धा घेण्यात आली. इयत्ता पहिली ते पाचवी गटात नीरजा मनोज वेदक या विद्यार्थीनीने प्रथम क्रमांक, सांची सदानंद मिसाळ- द्वितीय क्रमांक, पायल सचिन पवार- तृतीय क्रमांक तर मनस्वी वसंत आंबेलकर या विद्यार्थीनीने चतुर्थ क्रमांक पटकावला. इयत्ता सहावी ते सातवी गटात शमिका नयनेश मुलूख हिने प्रथम क्रमांक, दिया अरुण मुलूख हिने द्वितीय क्रमांक, वेदीका सुभाष मुलूख हिने तृतीय क्रमांक तर वैष्णवी वसंत आंबेलकर या विद्यार्थीनीने चतुर्थ क्रमांक पटकावला. चित्रकला स्पर्धेसाठी शाळेतील शिक्षक मनोज वेदक व बाबू घाडीगांवकर यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. स्पर्धेतील विजेत्या व सहभागी विद्यार्थ्यांचे शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना सावंत, मानसी सावंत यांनी अभिनंदन केले. चंद्रनगर मतदान केंद्रासाठी नियुक्त असलेले झोनल ऑफीसर जनार्दन राणे यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन कौतुक करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here