⭐वाहनचालक व नागरिकांची मागणी
🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l सिंधुदुर्ग l (आबा खवणेकर):-
कणकवली शहरातील वागदे गडनदी हळवल फाटा येथील त्या तीव्र अपघाती वळणावर हायमास्ट बसवण्याबाबत अनेकदा मागणी करण्यात आली होती.कारण याठिकाणी होणारे अपघात हे रात्र वेळी झालेले आहेत. त्यामुळे बऱ्याच वेळा वाहनचालकांना देखील या वळणाचा अंदाज येत नाही. जर या वळणावर एखादा हायमास्ट बसवला असता तर निदान या वळणाचा अंदाज वाहनचालकांना येऊ शकेल.अशी मागणी वाहनचालक व नागरिकांमधून होत आहे.https://sindhudurgsamachar.in/kokan-श्री-देवी-माऊली-मंदिर-तिर/
तसेच काही महिन्यांपूर्वी जाणवली येथे मुंबई – गोवा महामार्गावर अपघात होऊन एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता.तेव्हा तेथील ग्रामस्थांनी रास्ता रोको केला होता.यावेळी प्रशासनच्या काही जबाबदार अधिकाऱ्यांना हळवल फाटा येथील वळणाबाबत माध्यम प्रतिनिधींनी प्रश्न विचारला होता. यावेळी प्रशासनाच्या अधिकऱ्यांनी हळवल फाटा येथील वळणावर हायमास्ट मंजुर झाला असल्याचे सांगितले होते. मात्र ते खरे की खोटे हे त्याचं अधिकऱ्यांना माहिती ? मात्र गडनदी पुलावर झालेला अपघात देखील जीवघेणाच ठरला.त्यामुळे संबंधित प्रशासनाने अपघात ? नोंद ? कारवाई ? आणि कोणाचा तरी प्राण गेल्यावर आर्थिक मदत असे न ठेवता येथील वळणाबाबत ठोस पाऊले उचलणे गरजेचे आहे. तसेच तात्काळ त्या ठिकाणी हायमास्ट बसवणे गरजेचे आहे. अशी मागणी वाहनचालक व नागरिक करत आहेत.
त्याचप्रमाणे नुकताच दोन दिवसांपुर्वी म्हणजेच गुरुवार दिनांक १३ फेब्रुवारी रोजी रात्री ७ – ४० दरम्यान सुसाट वेगात असलेल्या ट्रक चालकाने मुंबई- गोवा महामार्गावरील कणकवलीतील वागदे गडनदी हळवल फाटा येथे जाणवली ते हळवल जाणाऱ्या दुचाकीला उडवले यात हळवल बौध्दवाडी येथील महिला सोनाली जाधव व तीचा १० वर्षाचा मुलगा दक्ष जाधव या असे दोघेही आई व मुलगा गंभीर जखमी झाले.तर यामध्ये दक्ष या मुलाचे गोवा बांबुळी येथे उपचारादरम्यान निधन झाले.तर त्याची आई अजूनही जखमी अवस्थेत आहे.दरम्यान ज्या वेळी हा अपघात रात्रीच्या वेळी झाला.त्यावेळी तेथे काळोख होता.अशा काळोख्या रात्री आई व मुलगा हे दोघे मुंबई-गोवा- महामार्गावरील गडनदी पुलावरील रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेली होती.परंतु त्यांना तब्बल २० मिनिटे कुणीच उचलले नाही.आईचा एकच आक्रोश माझ्या मुलाला कुणीतरी वाचवा हो! अशी हाक मारत होती.बघण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.मात्र कोणीही त्या दोघांनाही मदत करायला पुढे आले नाही.याच दरम्यान कुडाळच्या दिशेकडे जाणारे पत्रकार आबा खवणेकर, वेंगुर्ले किनळणेवाडी येथील बाबल घाटकर व सिंधुदुर्ग चालक असोसिएशनचे अध्यक्ष विजय जांभळे या सर्वानी जखमी अवस्थेत असलेल्या त्या आईला व मुलाला आपल्या फोर व्हीलर एर्टिगा कारमधून कणकवलीतील नागवेकर यांच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.परंतु त्या मुलाचा गोवा-बांबुळी येथे उपचारादरम्यान निधन झाले.तसेच यावेळी कणकवलीकरांनी तब्बल १ तास महामार्ग रोखून धरत त्या काळोखात रास्ता रोको केला होता.
त्यामुळे प्रशासन आता तरी त्या ठिकाणी तात्काळ हायमास्ट बसवणार का?तसेच वाहनचालक व नागरिकांच्या या मागणीला गांभीर्याने घेते की पुन्हा येरे माझ्या मागल्याच होतंय हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे.