मुंबई : बंगालच्या खाडीत पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला आहे. देशातील अनेेक राज्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात पाऊस कोसळेल असे सांगताना कोकणासह गोव्यात 7 ते 9 सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मान्सूनचा पाऊस आता परतीच्या मार्गावर आहे. या वर्षी चांगला पाऊस झाल्याने राज्यातील अनेक धरण शंभर टक्के भरली आहेत. तर अनेक ठिकाणी महापूरसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, आता हवामान विभागाने पावसाबाबतीत आणखी एक इशारा दिला आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-मुंबई-गोवा-महामार्गावर-व/
पश्चिम-मध्य आणि लगतच्या उत्तर-पश्चिम बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे, जे आज मध्य आणि लगतच्या उत्तर बंगालच्या उपसागरावर आहे. 9 सप्टेंबरच्या सुमारास ते हळूहळू उत्तरेकडे सरकण्याची आणि वायव्य बंगालच्या उपसागरात आणि पश्चिम बंगालच्या गंगा मैदानी प्रदेश, उत्तर ओडिशा आणि बांग्लादेशच्या किनार्याभोवती तीव्र दाबाच्या क्षेत्रात तीव्र होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे पुढचे तीन दिवस मुसळधार पाऊस होऊ शकतो.
6 ते 7 सप्टेंबर दरम्यान गुजरातमध्ये, 6 ते 9 सप्टेंबर दरम्यान मध्य महाराष्ट्रातील घाट भागात, 7 ते 9 सप्टेंबर दरम्यान कोकण आणि गोव्यात अतिवृष्टी होऊ शकते. त्याचबरोबर सौराष्ट्र, कच्छमध्ये 6 ते 7 सप्टेंबर, पश्चिम मध्य प्रदेश, गुजरात 6 ते 8 सप्टेंबर, पूर्व मध्य प्रदेशात 6 ते 8 सप्टेंबर, 11 आणि 12 सप्टेंबर, कोकण आणि गोव्यात मुसळधार पाऊस पडेल. 6 ते 11 सप्टेंबर दरम्यान सुरू राहण्याची शक्यता आहे. दक्षिण भारतासाठीही हवामान खात्याने इशारा दिला आहे. कर्नाटक, केरळ, माहे, किनारी आंध्र प्रदेश, यानम, तेलंगणा, लक्षद्वीपमध्ये या आठवड्यापर्यंत पाऊस सुरू राहणार आहे. यापैकी कोस्टल आंध्र प्रदेश, 8 ,9 आणि 10 सप्टेंबरला तेलंगणा, तर केरळ, माहे, कोस्टल आंध्र प्रदेश, यानाम, कोस्टल कर्नाटक, 6-10 सप्टेंबरला तेलंगणा, 8 तारखेला जोरदार पाऊस पडू शकतो. 10 सप्टेंबरमध्ये मुसळधार पावसाचा इशारा आहे.