प्रतिनिधी- अभिमन्यू वेंगुर्लेकर
कुडाळ (प्रतिनिधी)- श्री देव रामेश्वर देवाची कृपा दृष्टी आणि हुमरळा वालावल गावातील जनतेने प्रेम आपुलकी कायमच दिली आहे असे गौरवोद्गार हुमरमळा येथील श्री देव रामेश्वर चरणीं नतमस्तक झाल्यानंतर आमदार वैभव नाईक यांच्या सन्मान करण्यात आला यावेळी आमदार वैभव नाईक यांनी काढले! https://sindhudurgsamachar.in/kokan-वेंगुर्ले-येथेल-रहिवाशी/
हुमरमळा वालावल येथील महाशिवरात्री उत्सवानिमित्त आ. नाईक यांनी श्री. देव रामेश्वर चरणीं नतमस्तक झाल्यानंतर उपसल्लागार श्री देव रामेश्वर समिती ने आ. नाईक यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार युवा कार्यकर्ते संदेश जाधव यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी आ. नाईक म्हणाले या गावची रथोत्सव परंपरा संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. श्री. देव रामेश्वर देवाचा रथ हा देखणा असुन भाविकांची श्रद्धाही आहे. असे सांगून आ. नाईक म्हणाले,’ हुमरमळा वालावल गावातील जनतेने विकासासाठी माझ्या आग्रह धरल्याने विकासाची अपेक्षा पुर्ण करु शकलो. तसेच श्री देव रामेश्वर देवतेने मला या भागाचा आमदार होण्याची संधी देऊन सेवा करण्याची ताकद मला दिली म्हणूनच या गावातील लोकांचा प्रेम आपुलकी कायमच आहे.’
यावेळी संदेश जाधव,बॅ नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री उमेश गाळवणकर, सरपंच श्री अमृत देसाई,युवा नेते राजू गवंडे, युवा सेनेचे तथा हुमरमळा ग्रामपंचायत सदस्य श्री मितेश वालावलकर, श्री पुंडलिक दळवी, श्री मयुर प्रभु, खजिनदार श्री प्रकाश परब, देवस्थान समितीचे पुंडलिक दळवी,पावशी शिवसेना विभागप्रमुख श्री दीपक आंगणे व ईतर उपस्थित होते