Kokan: हुमरमळा परिसरात रानटी गव्यारेड्यांच्या कळपाचे धुमशान

0
72
रानटी गव्यारेड्यांच्या कळपाचे धुमशान
हुमरमळा परिसरात रानटी गव्यारेड्यांच्या कळपाचे धुमशान

बागायती शेतीचा लावला निकाल..ऐन शिमग्यात शेतकर्यानी ठोकली बोंबाबोंब. ⭐करमळगाळू ,हुमरमळा, चेंदवण,ग्रामस्थ झालेत त्रस्त

हुमरमळा/मनोज देसाई. -चेंदवण लोकवस्ती परिसरात वाढत्या गव्यारेड्यांच्या मुक्त संचाराने शेतकरी, ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. हुमरमळा येथील शेती -बागायतीमध्ये सदर गवारेडे कळपाने घुसून शेती -बागायतीची नासधूस करत आहेत. https://sindhudurgsamachar.in/kokan-मालवणातील-ट्रॉलर-मालक-या/

हुमरमळा परिसर हा जंगलमय परिसर आहे. येथील रस्तेही डोंगरी भागातून जातात. काही दिवसांपूर्वी वाहनचालकांच्या समोरच गवारेड्यांचा कळप आला होता. दैव बलवत्तर म्हणूनच वाहनचालकाचा जिव वाचला होता. कळपाने शेतीचीही नासधूस केली आहे. याबाबत वनखात्याने लक्ष घालून बंदोबस्त करावा, अशी आग्रही मागणी हुमरमळा सरपंच श्री. अमृत अरूण देसाई यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here