कुडाळ (प्रतिनिधी) स्थानिक ग्रामस्थांच्या मेहनतीने उभ्या राहिलेल्या रामेश्वर विद्या मंदीर जि प शाळेची पक्की इमारत व्हावी यासाठी गेल्या सहा महिन्यांपूर्वी पालकांनी आमदार वैभव नाईक यांच्या कडे निधीची मागणी केली होती .ही मागणी आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून लवकरच पुर्ण होत असल्याची माहिती पालकांच्या बैठकीत हुमरमळा वालावल सरपंच श्री अमृत देसाई यांनी दिली. हुमरमळा रामेश्वर विद्या मंदीर शाळेत पालकांची बैठक सरपंच श्री देसाई व अतुल बंगे यांच्या उपस्थितीत नुकतीच संपन्न झाली.https://sindhudurgsamachar.in/kokan-अॅड-श्री-नंदन-वेंगुर्ले/
यावेळी पालकांनी ही शाळा पुढचा पावसाळा येण्या अगोदर पुर्ण होण्यासाठी आग्रह धरुन आम नाईक यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे पुन्हा एकदा विनंती करण्याचे ठरले. यावेळी श्री देसाई यांनी भ्रमर ध्वनी द्वारे आम नाईक यांच्याशी संपर्क साधुन शाळेसाठी निधी किमान २० लाख देण्याची विनंती केल्यानुसार आम नाईक यांनी येत्या महिन्याभरात २० लाख रुपयांचा निधी देण्याची हमी दिली.
यावेळी पालकांच्या बैठकीत आम नाईक यांचे आभार मानले, तसेच पालकांनी आमदार वैभव नाईक यांचे सरपंच श्री अमृत देसाई यांच्याकरवी पुष्प गुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत सदस्य श्री मितेश वालावलकर, युवा सेना शाखाप्रमुख संदेश जाधव,पालक संघाच्या अध्यक्षा सौ ताम्हणेकर, उपाध्यक्ष्या श्रीम वालावलकर,पालक भरत परब, आबा कंद्रेकर, दत्ता गुंजकर,पांडु सावंत,राजन कंद्रेकर, जेष्ठ ग्रामस्थ शरद वालावलकर,नाथा ताम्हणेकर, निलेश परब,सौ दीपा गुंजकर व मुख्याध्यापिका सौ फणसेकर, शिक्षीका सौ गोसावी उपस्थित होते