Kokan: हुमरमळा वालावल गावातील आठ वर्षांच्या कु .प्रेम परब या चिमुकल्याने रेखाटले आमदार वैभव नाईक यांचे हुबेहुब चित्र!

0
123
आठ वर्षांच्या कु .प्रेम परब या चिमुकल्याने रेखाटले आमदार वैभव नाईक यांचे हुबेहुब चित्र!
आठ वर्षांच्या कु .प्रेम परब या चिमुकल्याने रेखाटले आमदार वैभव नाईक यांचे हुबेहुब चित्र!

कुडाळ- हुमरमळा वालावल गावातील आठ वर्षांच्या मुलगा प्रेम भगवान परब हा आमदार वैभव नाईक यांच्या प्रेमातच पडला गेली चार वर्षे तो आमदार वैभव नाईक यांचे हुबेहुब चित्र रेखाटण्याचा सराव करीत होता. प्रेमचे आजोबा हे व्यावसायीक फर्निचर कारागिर आहेत तर वडील छोटी मोठी कामे करत असतात त्याची आई हुमरमळा येथे रेडीमेड कपड्याचे दुकान चालवते https://sindhudurgsamachar.in/kokan-कोकणात-जाणाऱ्या-गणेश-भक्

कु.प्रेमला चित्रकलेची उपजत कला इश्वरी देणगी लाभली अाहे. आमदार वैभव नाईक हे त्याचे आवडते व्याक्तीमत्व आहे. गेली दोन वर्षे आमदार वैभव नाईक यांचे चित्र रेखाटण्यातचा सराव तो करत होता. या वर्षी मात्र प्रेमला यात यश आले आणि हुमरमळा येथील अतुल बंगे मित्र मंडळ आयोजित दहीहंडी कार्यक्रमात त्याचा सन्मान खुद्द आमदार वैभव नाईक यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, युवा सेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट, कुडाळ तालुका शिवसेना उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, शिवसेनेचे अतुल बंगे,मा सरपंच सौ अर्चना बंगे, कुडाळ तालुका शिवसेना संघटक बबन बोभाटे, कुडाळ शिवसेना शहरप्रमुख राजु गवंडे,अमृत देसाई व इतर मान्यवर उपस्थित त्याचा गौरव करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here