Kokan: हुमरमळा वालावल गाव आणि आमदार वैभव नाईक हे जिव्हाळ्याचे नाते- शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते

1
21
शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते
हुमरमळा वालावल गाव आणि आमदार वैभव नाईक हे जिव्हाळ्याचे नाते -शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते

🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार/कुडाळ/प्रतिनिधी-

हुमरमळा (वालावल)गाव आणि आमदार वैभव नाईक हे जिव्हाळ्याचे नाते जुळलेले आहे म्हणुनच येथील गावकरी आम नाईक यांच्या खंबिरपणे पाठीशी आहेत असे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी केले. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार आमदार वैभव नाईक यांच्या प्रचारार्थ हुमरमळा वालावल येथील श्री देव रामेश्वर मंदिरात श्रीफळ ठेवुन शुभारंभ करण्यात आला यावेळी श्री पडते बोलताना म्हणाले आम नाईक यांना या गावातील लोकांनी भावाप्रमाणे,मुला प्रमाणे प्रेम दीले विकासासाठी गावातील कामे करुन देताना मागेल ते काम विकासाचे दीले या शिवाय येथील लोकांसाठी सतत संपर्कात राहून आपला घरातील व्यक्ती आणि हक्काचा माणुस म्हणून तुम्ही प्रेम दीलात या रामेश्वर देवाच्या कृपेने आणि तुमच्या सर्वांच्या आशिर्वादाने आम नाईक म्हणून महाशिवरात्री ला पालकमंत्री म्हणून येतील अशा शुभेच्छा तुम्ही द्याल अशी अपेक्षा श्री पडते यांनी व्यक्त केली https://sindhudurgsamachar.in/kokan-कोकणात-जीआय-नोंदणीधार

यावेळी मा पंचायत समिती सदस्य श्री अतुल बंगे म्हणाले आमदार वैभव नाईक यांची या गावातील विकास कामे बोलत आहेत आणि दीसत आहेत पुर्ण झालेले देसाई वाडा पुल,सुरु असेलेले ग्रामपंचायत बांधकाम भव्य दिव्य होत आहे तसेच हुमरमळा श्री रामेश्वर विद्या मंदिर शाळा नविन इमारत,बिजोळेवाडी येथे होणारे पुल,बिजोळेवाडी डांबरीकरण रस्ता, करमळीवाडी तुवाचे राई ते खिंड रस्ता ही कामांसाठी निधी देऊन या अगोदर गावातील कोट्यावधी रुपयांच्या कामांसाठी निधी देऊन गावातील प्रत्येक कार्यक्रमात आम नाईक सहभागी असुन सतत संपर्कात असतात म्हणून गावातील ग्रामस्थ महीला,युवक हे आमदार वैभव नाईक यांनाच विजयी करतील अशी आशा श्री बंगे यांनी व्यक्त केली

यावेळी सरपंच श्री अमृत देसाई, उपसरपंच सौ रश्मी वालावलकर, ग्रामपंचायत सदस्या सौ संजना गुंजकर, युवा सेना विभाग प्रमुख मितेश वालावलकर, शाखाप्रमुख रमेश परब, युवा सेना शाखा प्रमुख संदेश जाधव,माजी ग्रामपंचायत सदस्य सौ सोनाली मांजरेकर, माजी ग्रामपंचायत सदस्या सौ रेणुका परब, माजी ग्रामपंचायत सदस्या सौ शिल्पा मयेकर, माजी ग्रामपंचायत सदस्य श्री शरद वालावलकर, सतीश मांजरेकर, श्रीमती मिनल परब, आशिर्वाद बंगे, माजी सरपंच सरपंच श्री सुरेश वालावलकर, विष्णु वालावलकर,विजय वालावलकर, माजी सरपंच सौ अर्चना बंगे, माजी ग्रामपंचायत सदस्या सौ रमा गाळवणकर, विठ्ठल कानडे,भाऊ गुंजकर,अभय मांजरेकर,सौ पुनम परब,माजी ग्रामपंचायत सदस्या मनाली पेडणेकर, सुरेश चव्हाण,दीपु चव्हाण,भाऊ गुंजकर,आबा मार्गी,अनिता प्रभु,गुरु परकर,बाळु हळदणकर,राजन कद्रेकर,विजय पेडणेकर, सुनिल मांजरेकर, सत्यवान कद्रेकर यश मार्गी, मयुर प्रभु, आदी उपस्थित होते

1 COMMENT

  1. […] वराड- आ. वैभव नाईक यांनी गेल्या १० वर्षात मतदार संघात केलेली विकास कामे,जनतेचे सोडवलेले प्रश्न याचे फलित निवडणुकीच्या निमित्ताने सुरू असलेल्या झंझावाती दौऱ्यात दिसून येत आहे.ज्या-ज्या गावात आमदार वैभव नाईक पोहोचतात त्या ठिकाणचे भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करत आहेत.आज मालवण तालुक्यातील वराड गावातील युवकांनी आ. वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर व कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून माजी आमदार. परशुराम उपरकर यांच्या उपस्थितीत आज कणकवली विजय भवन येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मशाल हाती घेतली आहे.यावेळी माजी. आमदार परशुराम उपरकर यांनी सर्व युवकांचे शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-हुमरमळा-वालावल-गाव-आणि-आ… […]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here