Kokan: हेट स्पीच आणि धार्मिक भावना दुखावल्या बाबत संबंधितांवर तात्काळ गुन्हा दाखल करा

0
42
हेट स्पीच आणि धार्मिक भावना दुखावल्या बाबत संबंधितांवर तात्काळ गुन्हा दाखल करा
हेट स्पीच आणि धार्मिक भावना दुखावल्या बाबत संबंधितांवर तात्काळ गुन्हा दाखल करा

संतप्त बांदावासीयांची पोलिस ठाण्यात लेखी तक्रार
संजय भाईप / सावंतवाडी
सावंतवाडी – विश्वबंधुत्वाची शिकवण देऊन सर्वांना सामावून घेणाऱ्या ‘सनातन धर्मा’ची डेंग्यू, मलेरिया, कोरोना, एड्स आणि कुष्ठरोग आदी रोगांशी तुलना करून ‘सनातन धर्मा’ला नष्ट करण्याची भाषा करणारे उदयनिधी स्टॅलिन, प्रियांक खर्गे, ए. राजा यांच्या सोबत पत्रकार निखिल वागळे आणि जितेंद्र आव्हाड त्यांच्यावर हेट स्पीच केल्याविषयी भारतीय दंड संहिता कलम 153(A), 153(B), 295(A), 298, 505 आणि ‘आय.टी. ॲक्ट’ अंतर्गत गुन्हे तात्काळ दाखल करावेत, आणि त्यांना अटक करावी. हा केवळ हिंदू धर्मावर हल्ला नाही तर हिंदू संस्कृती, संस्कार आणि उज्ज्वल परंपरेचा त्यांनी अपमान केला आहे. असे बांदा येथील धर्माभिमानी यांनी बांदा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी मध्ये म्हटले आहे.https://sindhudurgsamachar.in/kokan-मराठा-बांधवांनी-आपले-आंद/

या वेळी अॅड्. (सौ.) लिना धुरी, सर्वश्री माजी सैनिक निलेश सावंत, हेमंत दाभोलकर, मंदार केसरकर, मनोहर देसाई, अविनाश देसाई, युवराज हरमलकर, सखाराम शेर्लेकर, गजानन मालोंडकर, सौ. सुनिता मुळ्ये, सौ. शितल देसाई, यांसह हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रकाश मालोंडकर, सनातन संस्थेचे श्री. शिवराम देसाई व अन्य साधक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here