चौके ( प्रतिनिधी )- : काळसे होबळीचामाळ येथे नेरुरपार पुलानजिक मालवण येथून कुडाळच्या दिशेने दुचाकीवरून जात असताना दुचाकीस्वार गोविंद पांडुरंग सारंग राहणार देवबाग (वय 64) यांचा दुचाकीवरील ताबा सुटून ते रस्त्यावर पडले. या अपघातात त्यांच्या डोक्याला मागील बाजूस मार लागून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने ते गंभीर जखमी झाले. गुरुवार 21 मार्च रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. https://sindhudurgsamachar.in/kokan-ठाकरे-शिवसेनेचे-शहरप्रम/
दरम्यान, गोविंद यांना अधिक उपचारासाठी कुडाळ ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. मात्र उपचारा पूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे डाक्टरांनी सांगितले. अशी माहिती मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिली. जिल्हा वाहतूक शाखा ओरोसचे पोलीस हेड कॉन्स्टेबल महेंद्र देउलकर यांच्यासोबत महिला हेड कॉन्स्टेबल संप्रसा सावंत , पोलीस नाईक अविनाश गायतोंडे यांनी दुर्घटनेनंतर अपघातस्थळी भेट दिली. मालवण पोलिसही दाखल झाली. पंचनामा व पुढील कार्यवाही पोलिसांकडून सूरू होती.