कोकण मार्गावर सोडण्यात येणाऱ्या रेल्वेगाड्यांचे आरक्षण १२० दिवसआधी म्हणजेच १० मेपासून खुले होणार आहे. नियमित रेल्वे गाड्यांसह ‘गणपती स्पेशल’ गाड्यांची आरक्षित तिकिटे मिळवण्यासाठी चाकरमान्यांची तिकीट खिडक्यांवर चढाओढ सुरू होणार आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-कोकणाला-अवकाळी-पावसाचा-अ/
कोकण मार्गावर नेमक्या किती गणपती स्पेशल चालवणार, हे अद्याप रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेले नाही, मात्र १० मेपासून गणेशोत्सवात धावणाऱ्या गाड्यांचे आरक्षण खुले होणार आहे. यामुळे चाकरमान्यांना गणपतीसाठी गावी येण्याचे नियोजन करणे सुकर होणार आहे.