वेंगुर्ला प्रतिनिधी- वायंगणी-हुलमेकवाडी समुद्र किनाऱ्यावर १० मार्च रोजी कासवमित्र सुहा तोरस्कर यांनी संरक्षित केलेल्या कासवाच्या २ घरट्यातून २०१ कासव पिल्ले कुडाळचे वनक्षेत्रपाल संदिप कुंभार, मठचे वनपाल सावळा कांबळे व वनरक्षक सूर्यकांत सावंत यांच्या हस्ते व कासव प्रेमींच्या उपस्थितीत नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. https://sindhudurgsamachar.in/kokan-सिंधुरत्नमधून-दहा-बचतगट/
या किनायावर ऑलिव्ह रिडले कासवाने लावलेल्या घरट्यातून मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कासव पिल्ले निघणार आहेत. त्यामुळे कासवपिल्ले पहाण्याचा आनंद घेण्यासाठी सागर सुरक्षा रक्षक सुहास तोरस्कर (९४०३०७२९९१) यांच्याशी संपर्क साधावा.