Kokan: ३१ जुलैपर्यंत रायगड किल्ला पर्यटकांसाठी बंद

0
26
रायगड किल्ला पर्यटकांसाठी बंद,
३१ जुलैपर्यंत रायगड किल्ला पर्यटकांसाठी बंद

रायगड: गेले दोन दिवस रायगड जिल्ह्याला पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. दुर्गराज रायगडावर ढगफुटी सदृश्य पावसाने पर्यटकांची त्रेधातिरपीट उडाली. त्यामुळे शिवभक्त आणि पर्यटक गडावर अडकून पडले होते. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर प्रशासनाच्या मदतीने त्यांना सुखरूप गडाखाली आणण्यात आले. गडावरुन गडपायथ्याला पाय-यांवरुन उतरताना त्यांचा कस लागला. दरम्यान, शिवभक्तांच्या सुरक्षिततेसाठी ३१ जुलैपर्यंत गडावर जाणारा मार्ग बंद करण्यात आला आहे. https://sindhudurgsamachar.in/kokanसोनवडे-तर्फ-हवेली-येथील-र/

उन्हाळी सुटीनंतर पावसाळी पर्यटनासाठी गडावर जाणारा पर्यटक वर्ग मोठा आहे. रविवारी (ता. ७) पावसाळ्यातील गड अनुभवण्यासाठी शेकडो पर्यटक गडावर आले होते. दुपारनंतर ढगफुटी सदृश्य पावसाने मात्र त्यांची कोंडी झाली. महादरवाजा ते वाळुसरे खिंडी दरम्यानच्या पायरी मार्गावर पाण्याचे लोट वाहू लागल्याने पर्यटकांना सुरक्षित ठिकाणी थांबून राहावे लागले. महादरवाजाच्या बुरुजांवरुन पाण्याचे लोट वाहू लागल्यानंतर काही पर्यटकांनी मोबाईलवर त्याचे व्हीडीओ रेकॉर्डिंग केले. पावसाचा जोर ओसरल्यानंतर सर्व जण गड उतार झाले.

दरम्यान, जिल्हा प्रशासन व रायगड विकास प्राधिकरणाने खबरदारीचा उपाय म्हणून ३१ जुलैपर्यंत गडावर पावसाळी पर्यटनासाठी गडमार्ग बंद केल्याचे जाहीर केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here