Kokan: 12 अनधिकृत वाळू रॅम्प महसूल पथकाने जेसीबी च्या साहाय्याने जमीनदोस्त

0
65
12 अनधिकृत वाळू रॅम्प महसूल पथकाने जेसीबी च्या साहाय्याने जमीनदोस्त
12 अनधिकृत वाळू रॅम्प महसूल पथकाने जेसीबी च्या साहाय्याने जमीनदोस्त

मालवण: डांगमोडे, कोईल येथील 12 अनधिकृत वाळू रॅम्प महसूल पथकाने जेसीबी च्या साहाय्याने जमीनदोस्त केले आहेत. कोईल गावात गडनदी पात्रातून अवैध वाळू उत्खनन होत असल्याची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली होती. https://sindhudurgsamachar.in/kokan-कराची-महाराष्ट्रीय-शिक्/

त्यानुसार जिल्हाधिकारी व मालवण तहसीलदार यांच्या आदेशानुसार कोईल, डांगमोडे किनारी मंडळ अधिकारी मसुरे, तलाठी मर्डे, कोतवाल मर्डे, प्रभारी तलाठी बांदिवडे, कोतवाल देऊळवाडा, पोलीस पाटील कोईल या महसूल पथकाने डांगमोडे किनारी अनधिकृत वाळू उत्खननसाठी उभारलेले 6 वाळू रॅम्प तसेच कोईल येथील दोन ठिकाणी असलेले 6 रॅम्प असे एकूण 12 अनधिकृत वाळू रॅम्प जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्यात आले आहेत.

तसेच अनधिकृत वाळू उत्खनन व वाहतूक बाबत गडनदी पात्रालगत डांगमोडे, बांदिवडे-कोईल, सय्यदजुवा या ठिकाणी पाहाणी करण्यात येत आहे. अशी माहिती मालवण तहसीलदार कार्यालय यांच्या वतीने देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here