मुबंई- कोकण रेल्वेवरील स्थानके आणि या मार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी लवकरच लोहमार्ग पोलिसांवर सोपविण्यात येण्याची शक्यता आहे. या मार्गावरील तीन स्थानकांमध्ये पोलीस ठाणे स्थापन करण्यासाठी लोहमार्ग पोलिसांनी राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर केला आहे. स्थानके, तसेच प्रवाशांच्या सुरक्षेची बाब लोहमार्ग पोलिसांच्या कक्षेत आल्यानंतर गुन्ह्यांचा तपास करणे सोपे होईल, असा विश्वास लोहमार्ग पोलिसांकडून व्यक्त होत आहे.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-nwes-पोषण-आहार-योजनेला-अच्छ/
आपल्या हद्दीतील स्थानके, तसेच प्रवाशांची सुरक्षा व घडणाऱ्या गुन्ह्यांचा तपास करता यावा यासाठी कोकण रेल्वेवरील तीन स्थानकांमध्ये पोलीस ठाणे स्थापन करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आल्याची माहिती लोहमार्ग पोलीस आयुक्त कैसर खालिद यांनी दिली. रोहा, रत्नागिरी आणि कणकवली येथे महत्त्वाची तीन पोलीस ठाणी स्थापन करण्यात येतील आणि या पोलीस ठाण्यांच्या अखत्यारित अन्य स्थानकांचा समावेश करण्यात येईल. त्यासाठी वरिष्ठ दर्जाचे अधिकारी, तसेच कर्मचारी आदी मनुष्यबळही उपलब्ध करण्याची मागणी करण्यात आली आहे


