Kokan: अखेर तिने तिच स्वप्न साकारलच..जिद्द,चिकाटीच्या जोरावर ती पोलिस झालीच !

1
36
काशी देविदास भोवर हिची अखेर सिंधुदुर्ग पोलीस दलात निवड
काशी देविदास भोवर हिची अखेर सिंधुदुर्ग पोलीस दलात निवड !

🟣 लहरों से डरकर नौका पार नहीं होती कोशिश करने वालों की हार नहीं होती. कुडाळ/प्रतिनिधी- काशी देविदास भोवर हिची अखेर सिंधुदुर्ग पोलीस दलात निवड झालीच आपल्याला पोलिसच बनायच आहे या एकाच इच्छेने तिला पिछाडल होत त्या साठी तिने जेव्हा जेव्हा पोलिस भरती लागली तेव्हा तेव्हा तीने त्यात भाग घेतला पण पदरी निराशाच मिळत होती तरी तिने आपली जिद्द चिकाटी सोडली नाही.. हताशही झाली नाही कि.. तिने आपला सरावही सोडला नाही.. उलट सरावात अधिक प्राविण्य मिळवता याव या साठी तीने गुरूकुल करिअर अकॅडमी ओरस येथील संस्थेत नाव दाखल करून प्रशिक्षण घेण्यास सुरवात केली. https://sindhudurgsamachar.in/kokan-चंद्रनगर-शाळेत-ऑगस्ट-क्र/

या प्रशिक्षण काळातही तिने इतर परिक्षाही दिल्या त्याच बरोबर पोलिस पाटील साठी भरती पुर्व परिक्षा तिने दिली होती त्यात पास होऊनही तीची संधी हुकली..मागिल पोलिस भरतीत परिक्षा देवून उत्तम गुणानी पास होऊन ही भरतीच्यावेळी प्रतिक्षा यादित ताटकळत अडकून राहीली.. तरी तिने हार मानलीच नाही.. आणि अखेरीस नियतिलाही तिच्या या जिद्द चिकाटीची दखल घ्यावीच लागली..म्हणून सांगावस वाटत ‘प्रयत्ने रगडीता वाळूचे कण, तेलही गळे..जर तुमच्यात धेय्य, जिद्द,चिकाटी,ठासून भरली असेल त्याच बरोबर हताश न होता आपल कार्य प्रमाणिकपणे करीत राहण्याची मनाची प्रबळ इच्छा शक्ती असेल ..तर यशाच शिखर निच्छितच तुम्ही गाठू शकाल. ते यश कोणीच तुमच्र्या पासून हिरावून घेवू शकत नाही हा जणू संदेशच तीने आपल्या कृतीतून दिला आहे..

आज यशाच शिखर गाठलेली काशी उर्फ रूचिरा हिचा यशाचा मार्ग हा प्रवास सहज सोपा नव्हता. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेली ही मुलगी आहे. हिचे वडील देविदास नारायण भोवर हे कुडाळ तालुक्यातील आंदुर्ले गावाचे रहीवाशी असून ते गोवा येथे सिक्युरिटी गार्ड ची नोकरी करतात तर आई निर्मला भोवर ह्या गृहीणी आहेत. देविदास भोवर यांना दोन मुली. या दोन्ही मुलींना त्यांनी मुलां सारखीच वागणूक त्यांनी दिली. मुलगा नसल्याची खंत त्यांनी कधीच बाळगली नाही. त्यांना भरपुर शिक्षण देवून स्व:ताच्या पायावर उभ करण्याची त्यांची मनोकमना, इच्छा प्रबळ होती. त्यामुळे तुटपुंज्या पगाराची नोकरी करून वेळ प्रसंगी लोकांच्या गाड्याही धुण्याच काम त्यांनी केल पण मुलींच्या शिक्षणात काही कमी पडू दिल नाही. त्यांच्या या कष्टाची जाण त्त्यांच्या मुलींनी ठेवली हे निश्चित. त्यांनी आढे- वेढे मार्ग न पत्करता आपल ध्येय निश्चित केल आणि त्यात त्या यशस्वीही झाल्या .याच गोष्टीच सर्वाधीक समाधान तीच्या आई वडीलांच्या मनाला अधिक सुख देत असणार आहे हे निश्चित!

1 COMMENT

  1. […] मुंबई:-नवीन शैक्षणिक धोरणानुसार व्यावसायिक शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढावे आणि मुलींना समप्रमाणात शिक्षणाच्या व्यापक संधी उपलब्ध होण्यासाठी राज्य शासनाने मुलींना व्यावसायिक उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. कौटुंबिक आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता असलेल्या मुलींना या निर्णयामुळे निश्चितच मोठी संधी उपलब्ध होणार आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-अखेर-तिने-तिच-स्वप्न-साक… […]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here