आंबडपाल येथे विकास कामांची केली भूमिपूजने; ग्रामस्थांनी सत्कार करत मानले आभार
प्रतिनिधी – पांडुशेठ साठम
मालवण – कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी बजेट २०२१- २२ अंतर्गत आंबडपाल येथील श्री भद्रकाली देवालय ग्रा. मा. ४१४ या रस्त्यासाठी २८ लाख रु मंजूर केले आहेत.तसेच जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत आंबडपाल नाईकवाडी हरिजनवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करण्यासाठी ५ लाख रु निधी मंजूर केला आहे. काल शुक्रवारी आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. दरम्यान आंबडपाल नाईकवाडी येथील हरिनाम सप्ताह कार्यक्रमाला आ. वैभव नाईक यांनी भेट दिली असता रस्त्यांच्या कामाला निधी मंजूर केल्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार करत आभार मानले. https://sindhudurgsamachar.in/kokan-अर्थसंकल्प-व-पुरवणी-मागण/
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, तालुका संघटक बबन बोबाटे, विभागप्रमुख दीपक आंगणे, शाखाप्रमुख आबा नाईक, विष्णू वंजारे, उप सरपंच गोट्या चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य प्रसाद नाईक, महादेव नाईक, प्रकाश नाईक, किशोर नाईक, पुंडलिक नाईक, चीवा राऊळ, प्रथमेश वंजारे, भूषण नाईक, आप्पाजी नाईक, बाप्पा नाईक ज्ञानदेव सावंत, नागेश नाईक, प्रमोद सावंत, विजय नाईक, आदित्य नाईक, हरेश नाईक, अरूण नाईक, संतोष नाईक, प्रवीण सावंत, बाबू आंबाडपालकर, मोहन नाईक, मनोज नाईक, महेश नाईक , शिवसैनिक उपस्थित होते.