बजेट २०२१-२२ अंतर्गत ०९.५० लाख रु. केले मंजूर
प्रतिनिधी – पांडुशेठ साठम
साळेल – बजेट २०२१-२२ अंतर्गत आमदार वैभव नाईक यांनी साळेल कुळकरवाडी ग्रा. मा. ३९९ रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे या कामासाठी ०९.५० लाख रुपये मंजूर केले आहेत. या कामाचे भूमिपुजन रविवारी आ. वैभव नाईक यांच्याप्रमुख उपस्थितीत करण्यात आले. साळेल गावातील ग्रामस्थांनी दिलेली विकास कामे मार्गी लावण्याचा दिलेला शब्द आ. वैभव नाईक यांनी पूर्ण केला आहे. त्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले. सत्ता कुणाची असो विकासाची जबाबदारी ही आमदार म्हणून माझी आहे. त्यामुळे यापुढील काळातही विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही असे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले. https://sindhudurgsamachar.in/kokan-दुर्गवीर-प्रतिष्ठान-महा/
यावेळी शिवसेना उपतालुकाप्रमुख बाळ महाभोज, विभागप्रमुख कमलाकर गावडे, साळेल सरपंच रवींद्र साळकर उपसरपंच नाना परब, सदस्य संपदा गावडे, सिध्दी पवार, समीर गावडे, राजाराम गावडे, रोशन गावडे, जयप्रकाश गावडे, नंदू गावडे, सदानंद गावडे, भानजी गावडे, साबाजी गावडे, चिन्मय तावडे, निशांत जामदार, प्रभाकर परब, संतोष गावडे, सुजित गावडे, संदेश गावडे, संजय गावडे, संतोष लोहार, तात्या गावडे, सखाराम तावडे, नाथा गावडे, कोमल गावडे, सान्वि पोफळे, पूजा गावडे, गायत्री गावडे, गणेश गावडे, विठोबा गावडे, भरत गावडे, समिक्षा गावडे, अनिता गावडे, साक्षी गावडे, प्रभावती गावडे, सुवर्णा गावडे, तेजस गावडे, अस्मिता गावडे, प्रमदा गावडे, प्रताप गावडे, विजय गावडे, जया गावडे, सुर्यकांत गावडे, उदय सुकाळे, सुजाता गावडे, रितू गावडे, कमलेश साळसकर, निखिल लोहार, प्रसाद साळसकर बाबू घाडी आदी शिवसैनिक ग्रामस्थ उपस्थित होते.