वेंगुर्ले- तालुक्यातील केळुस येथील आकाश फिश मिल कंपनीकडून होणाऱ्या मनमानीस सहकार्य करणाऱ्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विरोधात आज केळुस, कालवी, म्हापण, खवणे,मळई येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण छेडले. मात्र सकाळपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसलेल्या चारशे ते साडेचारशे जनसमुदायासमोर जिल्हाधिकारी यांनी स्वतः येऊन लोकांना निर्णय देणे अपेक्षित होते. परंतु एवढ्या मोठ्या संख्येने लोक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिवसभर उन्हात बसलेले असताना देखील जिल्हाधिकारी यांना त्यांची दखल घ्यावी अशी का वाटली नाही असा संतप्त सवाल उपस्थित करत त्या ठिकाणी जमलेल्या सर्वांनी जिल्हाधिकारी यांच्यासह प्रशासनाचा निषेध केला. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-नरहरी-झिरवळांसह-आदिवास/परतीच्या-प्रवासा-दरम्या/
याआधी झालेल्या जनता दरबारामध्ये देखील या अन्यायग्रस्त ग्रामस्थांनी निवेदने सादर केलेली होती परंतु त्या ठिकाणी त्यांना योग्य न्याय न मिळाल्याने आज त्यांना प्रत्यक्ष उपोषण करण्याची वेळ आली एवढे असून देखील प्रशासनाने सोमवारी दिलेल्या शब्दाप्रमाणे योग्य ती कारवाई न केल्यास मंगळवारपासून ते बेमुदत उपोषण तीव्र स्वरूपात करणार असल्याचा इशारा संतप्त केळूस पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी दिला आहे.