⭐टॅंम्पो चालक व जोडीदार यांचे घटनास्थळावरून पलायन
कुडाळ-आकेरी येथे मोटार सायकल व फोरव्हीलर टॅम्पो यांच्यात टक्कर होऊन झालेल्या अपघातात माणगाव नानोली येथील १९ वर्षीय युवक गंभीर जखमी तर टॅम्पो चालक अन्य साथीदार यांनी केले पलायन – माणंगाव,नानोली येथील दिपक विनायक सावंत हा १९ वर्षीय युवक मोटार सायकलने झाराप मार्गे सावंतवाडीच्या दिशेने येत असताना हा अपघात घडला यात हा युवक गंभीर जखमी झाल्याने त्याला १०८ च्या मदतीने सावंतवाडी उपजिल्हा रूगणालयात दाखल केले. उपस्थित डाॅ.निखील अवधूत अस्थिरोगतज्ञ यांनी यांनी तातडीने योग्य औषधोउपचार तसेच सिटीस्कॅन केले. https://sindhudurgsamachar.in/kokan-मालवण-तालुका-शिवसेना-उद्/
या अपघातात युवकाच्या डोक्याला(मेंदुला) तसेच डोळ्याला गंभीर दुखापत झाल्याने पुढील उपचारासाठी सदर युवकास गोवा बांबुळी येथे पाटवण्यात आले असून सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मसुरकर यांनी विषेश सहकार्य केले. – अपघात स्थळावरून भितीपोटी पलायन केलेल्या आयशर टॅम्पोंचालक आणि त्याचा साथीदार यांचा पोलिस शोध घेत आहेत अशी माहीती जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र मसुरकर सावंतवाडी यांनी दिली आहे.