Kokan: आचिर्णे येथे शहिद वीर लक्ष्मण रावराणे यांना प्रजासत्ताकदिनी दिली मानवंदना

0
16
प्रजासत्ताकदिन,
आचिर्णे येथे शहिद वीर लक्ष्मण रावराणे यांना प्रजासत्ताकदिनी दिली मानवंदना

🛑 रावराणे कुटुंबियांच्या वतीने माजी सैनिक, सेवानिवृत्त पोलीस यांचा करण्यात आला सत्कार

🛑 युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची उपस्थिती

🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l कणकवली-

आचिर्णे मधलीवाडी गावचे सुपुत्र शहिदवीर लक्ष्मण वासुदेव रावराणे यांना 1971 सालच्या भारत पाकिस्तानच्या युद्धात त्त्यांनी आपले प्राण भारत मातेसाठी अर्पण करत ते या युद्धात शहिद झाले. त्यांना मरणोत्तर वीर चक्र देण्यात आले. 1990 साली त्यांना महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. आपल्या देशासाठी जीवाची बाजी अर्पण केलेल्या शहिद वीर लक्ष्मण रावराणे यांच्या स्मारकचा 13 वा वर्धापनदिन आज आचिर्णे येथे संपन्न झाला. 26 जानेवारी प्रसासत्ताकदिनी त्यांना मानववंदना देऊन गावातील माजी सैनिक व सेवानिवृत्त पोलीस यांचा सत्कार करण्यात आला. तसेच शालेय विदयार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-प्रधानमंत्री-सूर्यघर-म//

यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून शहीदवीर लक्ष्मण रावराणे यांना मानवंदना दिली. यावेळी उपतालुका प्रमुख राजू रावराणे, वैभववाडी पोलीस निरीक्षक, गटविकास अधिकारी जंगले, गावचे सरपंच रुपेश रावराणे, गिरीधर रावराणे, उपसरपंच कडू मॅडम, ग्रामसेवक हांडे मॅडम, गावचे पोलीस पाटील, जयसिंग रावराणे, फोंडके सर, तारेकर सर, तसेच शहिदवीर लक्ष्मण रावराणे यांचे चिरंजीव सत्यवान रावराणे, माजी सभापती लक्ष्मण रावराणे व आदी गावातील ग्रामस्थ यावेळी उपस्थित होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here