Kokan: आमडोस पावनवाडी रस्त्याचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन

0
76
भूमिपूजन
आमडोस पावनवाडी रस्त्याचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन

महाविकास आघाडी सरकारच्या काळात बजेट अंतर्गत ३० लाख रु मंजूर

प्रतिनिधी- पांडुशेठ साठम

मालवण : मालवण तालुक्यातील आमडोस पावनवाडी ग्रा. मा. २९५ या रस्त्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात बजेट २०२१- २२ अंतर्गत ३० लाख रु मंजूर केले असून आज या रस्त्याचे भुमिपूजन आ. वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना तालुकप्रमुख हरी खोबरेकर,उपतालुकाप्रमुख पराग नार्वेकर, भाजप सरपंच सुबोधिनी परब यांसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-सरकारी-कागदपत्रांवर-आई/

यावेळी आमदार वैभवजी नाईक यांनी मालवण तालुक्यामध्ये विकासाची जबाबदारी आपली असून ती पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. सामान्य लोकांना काय दिले पाहिजे, त्यांच्या काय अडचणी आहेत यासाठी आपण लोकप्रतिनिधी म्हणून पाठपुरावा सातत्याने करत असतो. जी जी विकास कामे करत आहोत ती आज विकास कामे पूर्ण होत आहेत. यापुढील काळातही अशाच प्रकारे विकास कामे करत राहू. आपण दाखवलेला विश्वासाला या मतदार संघाचा आमदार म्हणून पात्र ठरलो.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर म्हणाले, मालवण तालुक्यातील ग्रा. मा. २९५ या रस्त्याच्या कामासाठी आमदार वैभव नाईक यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात बजेट २०२१- २२ अंतर्गत ३० लाख रु मंजूर केले आहेत. सन २०२२ रोजी या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली.मात्र त्यानंतर सत्तांतर झाल्याने शिंदे-फडणवीस सरकारने या विकास कामासह आमदार वैभव नाईक यांच्या मतदारसंघातील अनेक विकास कामांना स्थगिती दिली होती. स्थगिती उठविण्यासाठी आ. वैभव नाईक यांनी सरकार कडे वारंवार मागणी केली. मात्र ५० खोक्यांसाठी आ.वैभव नाईक शिंदे गटात गेले नाहीत म्हणून विकास कामांवरील स्थगिती कायम ठेवण्यात आली. त्यामुळे नाईलाजाने आ. वैभव नाईक यांना शिवसेना पक्षाच्या माध्यमातून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करावी लागली. त्याअनुषंगाने विकास कामांवरील स्थगिती उठविण्याबाबतचे एफिडेव्हिट सरकारने न्यायालयात सादर केले. त्यामुळे कोर्टामार्फत विकास कामांवरील स्थगिती उठविण्यास सरकारला भाग पाडण्यात आले. त्यामुळे या कामांना सुरुवात करण्यात येत आहे. कुडाळ मालवण मतदार संघात अशी अजून विकास कामे असून त्यावरील स्थगिती कोर्टाच्या आदेशामुळे उठली आहे.त्याचीही भूमिपूजने लवकरच होणार आहेत.

यावेळी विभागप्रमुख विजय पालव, शाखाप्रमुख विशाल धुरी, युवासेना उपतालुकाप्रमुख अमित भोगले, उपशाखाप्रमुख दिलीप परब, नांदरूख माजी सरपंच दिनेश चव्हाण, आयवान फर्नांडिस, विनोद धुरी, दशावतार कलाकार ओमप्रकाश चव्हाण, विनायक सावंत,विवेक सावंत, प्रताप पवार, आबा सावंत, अरुण धुरी, प्रवीण मराळ, नारायण नाईक, निलम नाईक, सुधा सावंत, कल्पना राणे, गोविंद धुरी, गीतांजली धुरी, गुरुदास कदम, संजय परब, योगेश नाईक,मनीष नाईक,हितेश राणे, गुरुनाथ परब,नागोजी करावडे,संतोष करावडे, दीपक परब,राजेंद्र परब, दिलीप नके गुरुजी, दिपलक्ष्मी परब, कल्पना नाईक, प्रतिज्ञा नाईक, बाळकृष्ण नाईक, प्रकाश आमडोसकर, महेश परब उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here