दापोली– सन- २०२३-२४ मध्ये झालेल्या इयत्ता पाचवीच्या पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद चंद्रनगर मराठी शाळेतील विद्यार्थीनी कु. आरोही महेश मुलूख हिने ग्रामीण गुणवत्ता यादीत स्थान पटकावले असून तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.https://sindhudurgsamachar.in/kokan-ज्युनिअर-न्यूटन-टॅलेंट-स/
दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद चंद्रनगर मराठी शाळेत शिकत असलेली कु. आरोही महेश मुलूख ही विद्यार्थीनी पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेस बसली होती. या परीक्षेत तिने उज्ज्वल यश संपादन केले असून रत्नागिरी जिल्हा ग्रामीण गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे. याशिवाय तिने गेल्याच शैक्षणिक वर्षात पार पडलेल्या रत्नागिरी जिल्हा परिषद आयोजित ‘नासा-इस्रो भेट’ परीक्षेतही उज्ज्वल यश संपादन करून ती इस्रोची वारी करून आली आहे.
कु. आरोही मुलूख हिस शिक्षिका मानसी सावंत यांचे मार्गदर्शन लाभले असून शाळेचे मुख्याध्यापक मनोज वेदक, शिक्षक बाबू घाडीगांवकर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रुपेश बैकर, उपाध्यक्ष राकेश शिगवण, चंद्रनगरच्या सरपंच भाग्यश्री जगदाळे, अर्चना सावंत, रीमा कोळेकर, गिम्हवणे केंद्रप्रमुख सुनिल कारखेले शिक्षण विस्तार अधिकारी पद्मन लहांगे, दापोली पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी अण्णासाहेब बळवंतराव आदी अनेकांनी अभिनंदन केले आहे.