वेंगुर्ला प्रतिनिधी- बॅ.बाळासाहेब खर्डेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त खर्डेकर महाविद्यालयातील इंग्रजी विभागातर्फे इंग्रजी भाषेतील घेतलेल्या वक्तृत्व स्पर्धेत सानिका वराडकर हिने प्रथम, सानिका गावडे हिने द्वितीय, सोनाली चेंदवणकर हिने तृतीय तर योजना नवार व फाल्गुनी नार्वेकर यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकाविला. https://sindhudurgsamachar.in/देश-विदेश-आरपीजी-ग्रुपच्/
स्पर्धेचे उद्घाटन प्राचार्य डॉ.एम.बी.चौगुले यांनी केले. इंग्रजी भाषेवर प्रभूत्व मिळवून खर्डेकर साहेबांचे नाव उज्ज्वल करा असे आवाहन चौगुले यांनी केले. स्पर्धेचे परिक्षण प्रा.देविदास आरोलकर, प्रा.वामन गावडे व प्रा.बी.एम.भैरट यांनी केले. इंग्रजी विभाग प्रमुख डॉ.मनिषा मुजूमदार यांनी प्रास्ताविकामध्ये स्पर्धेचा उद्देश स्पष्ट केला. सूत्रसंचालन डॉ.बी.जी.गायकवाड यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी इंग्रजी विभागाचे प्रा.एस.एस.कांबळी यांनी विशेष प्रयत्न केले. स्पर्धेतील विजेत्यांना २६ डिसेंबर रोजी गौरविण्यात येणार आहे.