⭐ बांधकाम कामगार यांना लाभापासून वंचित – – शासनाने काढलेल्या जी आर मधे.गाम्रसेवकांनी प्रमाणपत्र द्यावे असा उल्लेखच नसल्याने प्रमाण पत्र देणे ही जबाबदारी आम्ही स्विकारू शकत नाही..आणि तसे केले तर उद्या आम्हालाच दोषी धरले जाईल..म्हणून आम्ही सह्या करत नसून प्रशासनाच्या निर्णयाची वाट पाहत आहोत
म्हापण/प्रतिनिधी-: इमारत बांधकाम कामगार यांना ९०दिवस किंवा त्यापेक्षा जास्त काम केल्याचे प्रमाणपत्र देण्यास ग्रामविकास अधिकारी यांनी बंद केल्याने बांधकाम कामगार यांना लाभापासून वंचित राहण्याची भीती निर्णय झाली आहे.या विषयी ग्रामविकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता आपल्या संघटने मार्फतच निर्णय घेण्यात आला आहे असे सांगण्यात येत आहे.परंतु एकीकडे शासन जनहितासाठी वेगवेगळ्या योजना घोषित करत आहे.मात्र काबाडकष्ट करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असलेला असंघटित बांधकाम कामगार पूर्ता यामुळे कोंडीत सापडला आहे. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-विलेपार्ले-पूर्व-येथील/
इमारत बांधकाम विभाग याकडून बांधकाम कामगार यांना पाच वर्षांसाठी कार्ड देण्यात येते व त्या कार्डचे दर एक वर्षानी नूतनीकरण करणे अनिवार्य आहे तसे न झाल्यास कार्डची मुदत पाच वर्षाची असून सुद्धा कामगार यांनी नुतनीकरण न केल्यास लाभापासून वंचित राहतात.व ते ओळखपत्र कार्ड सुरळीतपणे चालू राहण्यासाठी काम करत असलेल्या कॉन्ट्रॅक्टर व ग्रामविकास अधिकारी यांच्या कडून ९०दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र अनिवार्य आहे.परंतु ग्रामविकास अधिकारी यांनी प्रमाणात बंद केल्याने अनेक बांधकाम लाभार्थी हे शिक्षण घेत असलेल्या आपल्या पाल्याचे शिष्यवृत्ती व इतर मिळणारे लाभ घेण्यापासून वंचित राहत असल्याने वेळीच संबंधित संघटना ,विभागाने तोडगा काढावा अशी मागणी सर्व सामान्य बांधकाम कामगार यांच्या वतीने करण्यात येत आहे.