Kokan: उड्डाणपूल कोसळणं ही दुर्दैवी घटना; कोणतीही हानी नाही हे महत्वाचं

0
45
मुंबई गोवा महामार्गावरील निर्माणाधीन उड्डाणपुल कोसळला
मुंबई गोवा महामार्गावरील निर्माणाधीन उड्डाणपुल कोसळला

▪️ त्रिसदस्यीय तज्ज्ञ समितीच्या अहवालानंतर दोषींवर कारवाई

▪️ सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडून पहाटे घटनास्थळाची पाहणी

रत्नागिरी-: सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज पहाटे चिपळूण येथील बहादूरशेख नाका येथे भेट देऊन, मुंबई गोवा महामार्गावरील कोसळलेल्या निर्माणाधीन उड्डाणपुलाची पाहणी केली. पूल कोसळणं ही दुर्देवी घटना आहे. यामध्ये कोणतीही हानी झाली नाही, हे फार महत्वाचं आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या श्री. गुप्ता, श्री. सिन्हा व श्री. मिश्रा या तिघाजणांच्या तज्ज्ञ समितीकडून तपासणी अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई केली जाईल, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. चव्हाण यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. https://sindhudurgsamachar.in/kokan-कुडाळ-येथील-वेलनेस-मेडिक/

मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण येथील बहादूरशेख नाका येथे काल कोसळलेल्या निर्माणाधीन उड्डाणपुलाची पाहणी सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. चव्हाण यांनी आज पहाटे केली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य अभियंता संतोष शेलार यांनी याबाबत माहिती दिली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता छाया नाईक, तहसीलदार प्रवीण लोकरे, माजी आमदार सदानंद चव्हाण, राजेश सावंत आदी उपस्थित होते.

सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. चव्हाण प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले, काल झालेली घटना ही दुर्देवी आहे. दोन किलोमीटरचा हा पूल आहे. ही घटना कशामुळे झाली, हे तपासणे अत्यंत गरजेचे आहे. राष्ट्रीय महामार्गाची असणारी तिघा तज्ज्ञ लोकांची समिती याची तपासणी करुन, अहवाल देईल. सुरक्षिततेच्या दृष्टीने वर असणारे गर्डल काढणे हे देखील महत्वाचे आहे. केंद्रीय रस्ते, वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी देखील गोवा मुंबई महामार्ग गतिने झाला पाहिजे, यासाठी बैठक घेवून सूचना केली होती. त्याबाबतची बँकेबाबतची समस्या देखील मार्गी लावली होती. मुंबई गोवा महामार्ग व्हायला हवा, ही प्रत्येकाची भावना आहे. त्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करतोय. घडलेल्या दुर्दैवी घटनेबाबत सुरक्षितता हाताळणीसाठी खबरदारी घेतली होती का ? त्याबाबत शहानिशा करण्यात येईल. त्यानंतर दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here