वेंगुर्ला प्रतिनिधी– गरीबीतून शिक्षण घेत कोणतेही क्लास न घेता कॉलेजमधील शिक्षण व घरी अभ्यास करुन उच्च माध्यमिक शालांत (बारावी) परीक्षेत वेंगुर्ला तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकाविलेल्या सारीकाकुमारी यादव हिचा उध्दव ठाकरे शिवसेनेतर्फे तिच्या घरी जात शहर प्रमुख अजित राऊळ व माजी नगराध्यक्ष संदेश निकम यांनी खास गौरव केला. https://sindhudurgsamachar.in/kokan-वेंगुर्ला-कॅम्प-व्हि-जी-फ/
बिहार राज्यातून मोलमजुरीच्या कामानिमीत गेली १५ वर्षे वेंगुर्ला तालुक्यात भाड्याच्या घरात वास्तव्य राहिलेल्या कुटुंबाचे प्रमुख सरोज यादव हे सेंटरींगची कामे प्रामाणिकपणे करत आहेत. आर्थिक परिस्थिती बेताची असताना त्यांनी आपली मुली सारीकाकुमारी यादव हिला शिक्षण देण्यासाठी केलेला प्रयत्न तसेच सारीकाकुमारीने आर्थिक परीस्थितीवर मात करी घेत असलेल्या शिक्षणात उज्वल यश संपादन केल्याबद्दल शिवसेनेचे वेंगुर्ला तालुका संफ प्रमुख भालचंद्र चिपकर यांनीही तिचा खास गौरव केला. यावेळी पुढील शिक्षण घेत असताना येणा-या अडचणी तसेच लागणा-या कागदपत्रांच्या पुर्ततेसाठी शिवसेनेच्या माध्यमातून आपण सहकार्य करून असे आश्वासन माजी नगराध्यक्ष संदेश निकम, शहर प्रमुख अजित राऊळ व तालुका संफ प्रमुख भालचंद्र चिपकर यांनी दिले. यावेळी फरान शेख, रमित शेख, विशाल जगताप, पप्या गावडे, तसेच कॅम्प गवळीवाडी येथील उद्धव ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटोओळी – उद्धव ठाकरे शिवसेनेतर्फे अजित राऊळ व संदेश निकम यांनी सारिकाकुमारी यादव हिचा सत्कार केला.