Kokan: कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळ आयोजित कुडाळ हायस्कूलच्या मैदानावर प्रजासत्ताक दिन सोहळ्याची जय्यत तयारी

0
60
कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळ
कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळ आयोजित कुडाळ हायस्कूलच्या मैदानावर प्रजासत्ताक दिन सोहळ्याची जय्यत तयारी

कुडाळ– कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळ आयोजित कुडाळ हायस्कूलच्या मैदानावर प्रजासत्ताक दिन सोहळा संपन्न होणार आहे.क.म.शि.प्र.मंडळाचे कार्याध्यक्ष श्री.शशिकांत गावडे यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-सिंधुदुर्गात-भाजपाकडून/

संत राऊळ महाराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.एन.लोखंडे, कुडाळ हायस्कूल ज्युनिअर कॉलेज मुख्याध्यापक श्री.दिनेश आजगावकर, इंग्लिश मिडियम प्रायमरी स्कूलच्या मुख्याध्यापिका मुमताज शेख,इंग्लिश मिडियम माध्यमिक स्कूलच्या मुख्याध्यापिका संपदा कामत यांचा सर्व विद्यार्थी वर्ग,तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग या सोहळ्याच्या आयोजनामध्ये सहभागी आहे.मान्यवरांना मानवंदना,एन.सी.सी.,एन.एस.एस, आदी पथकांचे संचलन,विविध सांस्कृतिक कार्यक्रम या सोहळ्यामध्ये होणार असून यासाठी काही महिन्यांपासून याचे नियोजन केले जात आहे.

विद्यार्थी आणि त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांनी प्रत्यक्ष मैदानावर सरावही सुरू ठेवला आहे. क.म.शि.प्र.मंडळाचे श्री.भाईसाहेब तळेकर(उपकार्याध्यक्ष),श्री.अनंत वैद्य (सरकार्यवाह),श्री.अरविंद शिरसाट (मुख्य कार्यकारी अधिकारी), श्री.सुरेश चव्हाण (सहकार्यवाह),आदींनी या आनंद सोहळ्यात उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here